दि,12,POL,कुणाल शेलार,मुरबाड -
मुरबाड तालुक्यातील असोसे येथील युवा कार्यकर्ता व आमदार कथोरेंचे खंदे समर्थक मयुर मनोहर एगडे यांनी आमदार किसन कथोरेंच्या वाढदिवसाचे औचित्य साधुन असोळे पंचायत समिती गणामध्ये नागरिकांसाठी मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन केले आहे.दि.11 सप्टेंबर रोजी मौजे असोसे येथून या शिबिराची सुरुवात केली असून असोळे गणातील असोसे,करवेळे,वाघिवली,असोळे,झापवाडी,शिदगाव, हिरेघर,किशोर अशा अनेक गावामध्ये संपूर्ण आठवडाभर अशा प्रकारचे नियोजन केले असून जर्मन टेक्नॉलॉजी मशीनद्वारे प्रत्येक माणसाचे फ्री चेकअप करून रिपोर्ट दिले जाणार आहेत.
यामध्ये वजन कमी करणे,वजन वाढविणे,कंबर,मान,पाठ,मुळव्याध,गुडघेदुखी,स्टोन,ब्लडशुगर,कोलेस्ट्रॉल, थायरॉईड
अशा विविध प्रकारच्या मोफत तपासण्या केल्या जात असून गंभीर आजारावर उपचार सुद्धा केले
जाणार असल्याची माहिती आयोजक मयुर एगडे यांनी दिली आहे.या शिबिरास गावातील जेष्ठ नागरिक
व महिला वर्गाने मोठ्या संख्येने उपस्थित राहून शिबिराचा लाभ घेतला आहे.लवकरच महिलांसाठी
मोफत कॅन्सर चेकअपचे सुद्धा आयोजन केले जाणार असल्याची माहिती यावेळी एगडे यांनी दिली.

.jpeg)

Post a Comment