BIG BREAKING NEWS...

आमदार किसन कथोरे यांच्या वाढदिवसानिमित्त समता सामाजिक फाऊंडेशन प्रकाशित "वादळ" विशेष अंकाचे प्रकाशन होणार...

 

दि,15,POL,कुणाल शेलार,मुरबाड -

समता सामाजिक फाउंडेशन, महाराष्ट्र राज्य तर्फे आमदार किसन कथोरे यांच्या वाढदिवसानिमित्त “वादळ” हा विशेष अंक प्रकाशित करण्यात येत आहे. या अंकामध्ये आमदार किसन कथोरे यांनी मुरबाड विधानसभा क्षेत्रासाठी केलेल्या उल्लेखनीय विकासकामांचा आलेख, तसेच विविध मान्यवरांच्या शुभेच्छा प्रकाशित करण्यात आल्या आहेत.समता सामाजिक फाउंडेशन गेल्या अनेक वर्षांपासून समाजोपयोगी कार्य करीत आहे. विशेषतः विद्यार्थी वर्गासाठी शैक्षणिक मदतीचे उपक्रम राबवून फाउंडेशनने एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. आमदार किसन कथोरे यांच्या वाढदिवसानिमित्त दरवर्षी फाउंडेशनकडून विशेष अंक प्रकाशित करून त्यांना  वाढदिवसानिमित्त खूप खूप शुभेच्छा दिल्या आहेत.या उपक्रमामध्ये फाउंडेशनचे अध्यक्ष शंकर करडे आणि त्यांच्या सहकाऱ्यांचे   फाउंडेशनचे पदाधिकारी यांचे विशेष सहकार्य लाभते.महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ,मुंबईचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष वसंतराव मुंडे आणि महाराष्ट्र प्रदेश संघटक नितीन शिंदे यांनी देखील आमदार किसन कथोरे यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.

मुरबाडच्या सर्वांगीण विकासाचा आलेख -

आमदार किसन कथोरे यांनी मागील काही वर्षांत मुरबाड तालुक्याचा विकास घडवून आणण्यासाठी मोठ्या प्रमाणावर प्रयत्न केले. यात –

* मुरबाड शहरातील रस्ते, पाणीपुरवठा व स्वच्छता प्रकल्पांना गती.

* शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक सुविधा, वसतिगृह प्रकल्प आणि क्रीडा साहित्य वाटप.

* ग्रामीण भागातील सिंचन प्रकल्प, जलजीवन मिशनांतर्गत शुद्ध पाणी योजना.

* आदिवासी व डोंगरी भागात आरोग्य शिबिरे, अंगणवाडी व शाळा दुरुस्ती कामे.

* पर्यटनाला चालना देण्यासाठी माळशेज घाट चा कायापालट निसर्ग पर्यटन प्रकल्पांचा आराखडा तसेच *मुरबाड  शहरातील भव्य दिव्य अशा शासकीय इमारती मुरबाड शहरासाठी अत्यंत जीवत प्रश्न होता तो *पाण्याचा पण आज महिला वर्गाच्या डोक्यावरील हंडा खरा उतरवला आहे तो आमदार कथोरे यांनीच त्यामुळे तालुक्यातील सर्व महिला आज आमदार किसन कथोरे यांचे आभार मानत आहेत.

* आज मुरबाड पोलीस स्टेशन हे कोकण विभागात महाराष्ट्रात  विभागात नंबर एक ने उभे आहे हे सर्व श्रेय आमदार किसन कथोरे यांनाच जाते.

* मुरबाड– कल्याण ठाणे  मालशेज घाट नगर पुणे रोड म्हसा कर्जत रोड जोडणाऱ्या रस्त्यांचे चौपदरीकरण आणि सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा विस्तार.

या कामांमुळे मुरबाड तालुक्याची ओळख केवळ ग्रामीण भागापुरती न राहता विकासाच्या नकाशावर ठळकपणे उमटली आहे. त्यामुळेच त्यांना संपूर्ण महाराष्ट्रात वादळ विकासाचे म्हणून संबोधले जाते.समता सामाजिक फाऊंडेशन महाराष्ट्र प्रकाशित वादळ ह्या विशेष अंका चे प्रकाशन 19 सप्टेंबर 2025 रोजी सकाळी साडेअकरा वाजता बदलापूर येथील आमदार किसन कथोरे यांच्या  निवासस्थानी होणार आहे.

 

Post a Comment

Previous Post Next Post