दि.20,POL,कुणाल शेलार,मुरबाड -
गुटखा, मटका अवैध धंद्याना मुरबाड शहरात पेव फुटले असून मोठया प्रमाणात खुलेआम सर्रासपणे हे धंदे प्रशासना समोर सुरु आहेत परंतु हप्तेबाजीमुळे त्याकडे लक्ष वेधून कारवाई केली जात नसल्याची सध्या चर्चा नाक्या नाक्यावर होऊ लागली आहे. अमली मुक्त पदार्थ म्हणून जनजागृती रॅली काढल्या यावेळी मुरबाड मध्ये 2 तास धंदा बंद ठेवा म्हणून सांगणारे हप्तेखोरच असल्यामुळे एका खात्यातील हप्ता घेणाऱ्याचे नाव आम्हाला कळाले असून याबाबत वरिष्ठाना लवकरच कळविण्यात येईल.गुटखा हा प्रत्येक पानटपरीत विक्रीसाठी असतो,पान टपरी व मटका धंदा संबंधित प्रशासनासमोर असूनही हप्तेबाजीमुळे कारवाईचा बडगा गुलदस्त्यातच राहिला आहे. गुटखा हा येतो की तो बनविला जातो याचा तपास करून गुन्हे दाखल करण्यासाठी संबंधित प्रशासक अपयशी ठरले आहे.मुरबाडमध्ये अवैध धंद्याना उधान आले असून मातनगरमध्येही शेटरच्या आड मटका धंदा भरवस्तीत सुरु असून यावर अधिकारी,प्रशासनाचे वचक राहिले नसून सदर मुरबाड नगरपंचायत,मुरबाड पोलीस स्टेशन शहरातच अवैध धंदे सुरु आहेत.याबाबत कोणतीही कारवाई होत नसून नागरिकांनी हप्तेखोर यांच्या विरोधात नाराजी व्यक्त केली आहे.

.jpeg)
Post a Comment