दि.19,POL,कुणाल शेलार,मुरबाड -
मुरबाड नगरपंचायतीचे नगराध्यक्ष
तसेच समाजसेविक म्हणून ज्यांनी सदैव नागरिकांची सेवा केली असे संतोष (बाबु)चौधरी यांनी
दिपावली सणाच्या तमाम जनतेला आमच्या माध्यमातून शुभेच्छा दिल्या आहेत.गेल्या काही महिण्या
राजकारणात घडलेला बदल आणि नव्याने उदयास आणलेला पॅनेल चर्चेत असताना जनता ठरवील तीच
माझी दिशा या विचारशैलीतून जनतेच्या कौलाचा विचार करणारे नगराध्यक्ष संतोष (बाबु)चौधरी
यांनी भ्आजपा पक्षाचा राजीनामा न देता तटस्य भूमिका घेतली असून आजही ते आमदार किसन
कथोरे यांच्याशीच एकनिष्ठ असून संतोष (बाबु)चौधरी यांच्यावर अविश्वास ठरावाची टांगती
तलवार असताना जनता जो निर्णय घेईल तोच मला मान्य असल्याचे त्यांचे उद्गार आहे.माझा
जन्म जनतेच्या सेवेसाठी व विकासासाठी झाले असून मी सध्यातरी तटस्य असल्याचे त्यांनी
आमच्याशी बोलतांना सांगितले आहे.संभ्रम जरी असला तरी आमदार किसन कथोरे यांच्यापासून
ते लांब गेले नसल्याचे चित्र आमदार श्री.कथोरे यांच्या वाढदिवसावेळी दिसून आले,त्यानंतर
मनोज देसले यांच्या भूमिपुजन वेळी प्रमुख उपस्थिती,एका कार्यक्रमात आमदार किसन कथोरे
व संतोष (बाबु)चौधरी यांची एकत्रित उपस्थिती हे गणितच जनतेला संभ्रमात पाडत आहे.त्यामुळे
परिवर्तन पॅनेल मध्ये त्यांचे नाव तर आहे परंतु पक्षाचा राजीनामाही त्यांनी दिला नसल्याने
अनेक प्रश्नाचे उत्तर सापडेनासे झाले आहे.अशातम मी आमदार साहेबांच्या मार्गदर्शनातून
घडलो आहे त्यांच्या आशिर्वादाने मी नगराध्यक्ष झालो त्यामुळेच सध्या ही वेळ नसून वेळ
आल्यावर मी माझी भूमिका स्पष्ट करणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे.माझ्या वार्डातील
दरवर्षीप्रमाणे यंदाच्याही वर्षी दिपावली सणाचे किट मी वाटप करित आलो आहे त्यामुळे
यंदाही मी ती परंपरा जोपासित असून सध्या दिपावली सण आहे त्यामुळे माझ्याकडून आमदार
किसन कथोरे साहेब व सर्व प्रशासकीय अधिकारी,कर्मचारी,नागरिकांना माझ्याकडून शुभेच्छा
आपल्या माध्यमातून देत असल्याचे यावेळी सांगितले.


Post a Comment