दि,21,POL,कुणाल शेलार,मुरबाड -
नुकताच जिल्हापरिषद गट व पंचायत समिती गण आरक्षण सोडत जाहिर झाली असून अनेक जणांनी आपण निवडणूक लढवायची म्हणून आपली उमेदवारी इच्छूकता जाहिर केली आहे.नुकताच झालेल्या सोडतीत नव्या चेहर्यांना संधी असल्याचे कळते.परंतु मुरबाड तालुक्यातील अनेक जणांनी आपली वर्जमुठ दाखवून विविध माध्यमातून केलेल्या विकास व समाजसेविका कामांचा लेखाजोखा मांडण्याचा प्रयत्न करतील असा अंदाज वर्तविला जात असून आमदार किसन कथोरे यांच्याकडून भाजपा पक्षातून तिकीटातून उमेदवारी मिळावी म्हणून इच्छा अनेक माध्यामतून व्यक्त करतांना दिसत आहे.कोणी गणातून तर कोणी गटातून इच्छूक उमेदवार आहेत परंतु कोणाची वर्णी लागेल हे गुलदस्त्यातच आहे.मध्यस्थी मुरबाड नगरपंचायतीचा संदर्भ डोळयासमोर ठेवून आमदार श्री.कथोरे यांना उमदेवारी देण्यासाठी पारदर्शकता उमेदवार व समर्थकांची पहावी करीवी लागणार आहे.ज्यांना पद,खुर्ची दिली त्यांनी दुतर्फी भूमिका घेतली त्यामुळे निष्ठावंतांना यंदा स्थान मिळण्याची शक्यतेची चर्चा होऊ लागली आहे.जो तो आपल्या कार्याचा पाढा तिकीटासाठी गाऊ शकतो आणि त्यातच जे विरोधातले होते ते उद्दया एकत्र येऊ शकतात म्हणूनच महायुती तिकीटातून उमेदवारी म्हणून कोणाची वर्णी लागेल हे सध्यातरी कळणं कठिण आहे.आमदार किसन कथोरे यांचे विकासकार्य प्रभावशाली असून उमेदवारांची निवडही विकासाच्या दृष्टिकोणातूनच असेल यात शंका नाही.
मुरबाड तालुक्यातील कळमखांडे गावातून सौ.मनिषा विजय कापडी या नव्या चेहर्यानी निवडणूक लढविण्याची इच्छा व्यक्त केली असून जर नवीन चेहर्याला संधी दिल्यास नक्कीच गाव खेडेपाडयात विकासाची गती वेगवान होईल त्यामुळे असे अनेक जणांनी गण व गटातील उमेदवारी मिळावी म्हणून साकडं घातले असेलच परंतु आमदार किसन कथोरे यांची निवडच विकासाला गती देणारी ठरेल असे जणमानसांत बोलले जात आहे.काही ठिकाणी आरक्षण सोडतीत इतर आरक्षण पडले असून महिला तिथं पुरूष नाराज व पुरूष तिथ महिला नाराज असलाची चर्चा असून नेमकी कोण उमेदवारी तिकीटाची बाजी मारेल,जिंकून येऊन आमदार किसन कथोरे यांचे एकनिष्ठ विश्वासू राहतील याकडे लक्ष लागून राहील.(उर्वरित पुढील भागात)



Post a Comment