दि,28,POL,कुणाल शेलार,मुरबाड -
मुरबाड शहरात सध्या खासगी व एमएससीआयटी क्लासेसची स्पर्धा पहायला मिळत असून अनधिकृत इमारती,भाडे तत्वावर असलेल्या इमारती,घरगुती बिल्डींग इमारती,भाडेपट्टा इमारतीमध्ये कोणतीही परवानगी न घेता विनापरवानगी बेकायदेशीर खासगी क्लासेस सुरू आहेत.विद्दयार्थ्यांना आकर्षित करण्यासाठी भेटेल तिथं बेकायदेशीरपणे बॅनरबाजी होत असून सदर बाब निदर्शनास येत असताना सदर क्लासेसची शासकीय मान्यताप्राप्त रजिस्टर नसल्याने सर्रास पालकांची ओळखीचे फायदा घेत फसवणूक केली जात आहे.विद्दयार्थ्यांना कमी फी मध्ये प्रवेश देऊन क्लासेसची विद्दयार्थी सख्यां वाढविण्याची आखणी केली जात आहे.त्यातच विद्दयार्थ्यांचे जिथं क्लासेस आहेत तिथं त्यांच्या संरक्षणाकरिता सीसीटीव्ही उपलब्ध नाहीत,बाथरूमची सुविधा नाहीत त्यामुळे विद्दयार्थ्याची सुरक्षा वार्यावर आहे.सुरू असलेले बेकायदेशीर क्लासेसवर प्रशासनाचे वचक राहिले नसून मनमानी पध्दतीने हम करे सो कायदा याने आज क्लासेस मुरबाड शहरात पाहायला मिळत आहे.या संदर्भात गटशिक्षणाधिकारी यांना सविस्तर वास्तविकता सांगून निवेदन दिले होते त्यावेळी आपले हात वर करून कोणत्या निकष नियमाखाली आम्ही कारवार्इ करायची आम्हाला कारवार्इ करता येत नसल्याचे सांगण्यात आल्याने चक्क मुरबाड गटशिक्षणाधिकारी यांचा बेकायदेशीर क्लासेसवर प्रेम आणि आशिर्वाद असल्याचे निदर्शनास आले आहे.आम्हाला शासकीय जिल्हापरिषदा असल्याने त्याबाबत तक्रार असे सांगून खासगी क्लासेसपासून टक्केवारी व दिवाळी भेट मिळाली असल्याचा संशय तक्रारदाराने व्यक्त केला आहे.सदर क्लासेस सुरू करित असताना आपल्याकडून व नगरपंचायत मुरबाड यांच्याकडून परवानगी घेतली गेलेली नसून क्लासेस घेणारे काही शाळेतील शिक्षक असल्याची माहिती सांगूनही आम्ही त्यांना कळवून ताकीत देऊ सांगणारे शिक्षणाधिकारी यांची तात्काळ बदली करावी अशी मागणी तक्रारदारांकडून करण्यात येत असून एकाच तालुक्यात किती वेळा गटशिक्षणाधिकारी केले गेले व कोणाच्या अशिर्वादाने याचा लेखी खुलासा ठाणे जिल्हा मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी यावा अन्यथा आमरण उपोषण मंत्रालयाच्या दालनात करण्यात येर्इल अशा थेट इशाराच दिला आहे.शाळेत मुलीवर अत्याचार होऊ नये म्हणून यंत्रणा व कमिटी सज्ज करण्यात आली परंतु विनापरवानगी व बेकायदेशीर खासगी क्लासेसवर गटशिक्षणाधिकारी यांचेच लक्ष नसून मुलींचे संरक्षण वार्यावर आहे.मुख्यतः क्लासेस सर्रासपणे मुरबाड तालुक्यात सुरू असल्याचे गटशिक्षणाधिकारी यांना माहिती आहे परंतु कारवार्इसाठी सक्षम नसल्याने ते अपयशी झाले आहेत.त्यामुळेच तक्रारदाराने गेल्या 2 महिण्यापूर्वी तक्रारी निवेदन देऊनही कारवार्इ शुन्य असल्याने गटशिक्षणाधिकारी तक्रार कोणतीही भूमिका घेत नसल्याने बघ्याची भूमिका घेत आले आहेत त्याचमुळे तक्रारदार यांनी आता थेट मंत्रालयाच्या दालनातच थान मांडण्याचा निर्धार केला असून जो पर्यंत गटशिक्षणाधिकारी यांची जिल्हयाबाहेर बदली व विनापरवानगी व बेकायदेशीर खासगी शिकवणी व एमएससीआयटी क्लासेसची समिती गठित करूण चौकशी लावीत नाही तोपर्यंत माघार घेणार नसल्याचे तक्रारदाराने या माध्यमातून इशाराच दिला आहे.

Post a Comment