दि.19,POL,कुणाल शेलार,मुरबाड -
नुकताच मुरबाड शहरातील सुसज्ज असे माहेर मल्टिस्पेशालिटी अॅण्ड नर्सिंग होम हॉस्पिटलचे दसराच्या शुभमुहुर्तावर आमदार किसन कथोरे यांच्या शुभहस्ते व अन्य मान्यवर यांच्या उपस्थितीत उद्घाटन सोहळा संपन्न झाला त्यानंतर अनेकांनी या हॉस्पिटलला शुभेच्छा दिल्या.शुभेच्छांचा वर्षाव प्राप्तीनंतर या हॉस्पिटलच्या संचालिका सौ.स्नेहल स्वप्निल वाकचौरे यांनी प्रथमच महिलांकरिता गर्भसंस्कार शिबीर कार्यक्रमाचे आयोजन केले होते सदर कार्यक्रम अस्मिता हिलींग सेंटर व माहेर मल्टिस्पेशालिटी अॅण्ड नर्सिंग होम हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्दयमाने घेण्यात आले.या कार्यक्रमात मोठया संख्येने महिलांनी आपला सहभाग नोंदविला.
यावेळी अस्मिता हिलिंग सेंटरच्या डॉ.अस्मिता अनिल तुपे (पीएचडी फुड अॅण्ड न्यट्रीशन) यांनी माहेर मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलच्या संचालिका सौ.स्नेहल स्वप्निल वाकचौरे,डॉ.प्रेरणा संजय बोरगे,बालरोग तज्ञ डॉक्टरांचे पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत केले.यानंतर डॉ.अस्मिता तुपे यांनी महिलांशी संवाद साधून त्यांना बाळाचं भविष्य हे शाळेत नाही तर आईच्या गर्भात घडतं असे मोलाचे मार्गदर्शन केले.त्याचबरोबर गर्भातील बाळ ऐकू शकतं,अनुभवू शकतं कारण ते बाळ आईच्या भावनांनुसार घडतं त्यामुळे आजच आईने आपल्या बाळाच्या भविष्यासाठी गर्भसंस्काराची मोती जपली पाहिजे.वैज्ञानिक संशोधन असे सांगते की,गर्भातील बाळाची बुध्दिमत्ता,स्वभाव,स्मरणशक्ती,आत्मविश्वास हे 70 टक्के गरोदरपणात ठरत असते त्यामुळेच मातृगर्भातीलच संस्कार बाळाचे व्यक्तीमत्व पुढिल भविष्यात त्याला घडवितात.गरोदरपणात बाळाच्या मेंदुच्या विकासासाठी आहार,डोहाळे कसे पुरवायचे, कुठला योग करावा,कोणती आसने करावीत,स्त्री सतत आनंदात राहण्यासाठी काय करावे,मंत्राध्यान व प्राणायाम,आई बाबांसाठी सोहार्द वाढविणार्या,भावनिक बंध मजबूत करणारे कपल अॅक्टिव्हिटीज,सकारात्मक विचार,संस्कारमय संगीत,प्रेमळ आहार,आनंदी वातावरण यावर महिलांना मोलाचे मार्गदर्शन यावेळी डॉ.अस्मिता तुपे यांनी केले व पटवून दिले.
गर्भसंस्कार ही निवड नसून ती आईपणाची कशी जबाबदारी असते त्यामुळे गर्भसंस्कार ही आईच्या जीवनातील अविस्मरणीय क्षण ही असतं असे डॉ.स्नेहल स्वप्निल वाकचौरे यांनी आपल्या मार्गदर्शनात महिलांशी संवाद करतांना सांगितले आहे.गर्भसंस्कार हा क्लास नाही तर सुवर्ण भविष्य घडविण्याची एक दिव्य प्रक्रिया आहे त्यामुळे महिलांना अनेक प्रकाराच्या प्रश्नांचे उत्तर मिळविण्यासाठी अस्मिता हिलींग सेंटरच्या डॉ.अस्मिता अनिल तुपे व माहेर मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलच्या संचालक डॉ.स्नेहल स्वप्निल वाकचौरे यांनी हा महत्वकांक्षी पुढाकार घेतला आहे.
अधिक माहितीकरिता महिलांनी डॉ.अस्मिता अनिल तुपे (मो.नं.9284561439) यांच्याशी संपर्क साधू शकता किंवा गल नं.35,पहिला मजला,छत्रपती प्रिंटच्या बाजूला,टीडीसी बँकेच्या पाठीमागे,कृषी उत्पन्न बाजार समिती इमारत,मुरबाड येथे प्रत्यक्षपणे भेट देऊ शकता.सदर गर्भसंस्कार कार्यक्रम म्हसा रोड माहेर मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल येथे संपन्न झाला या कार्यक्रमात अनेक महिलांनी व त्यांच्या पतींनी उत्तुंग असा प्रतिसाद दिला.


Post a Comment