(दि.25,POL
- कुणाल शेलार,मुरबाड)
मुरबाड नगरपंचायतीच्या 2022 ते
2027 या चालू कार्यकाळातील गेल्या अडीच वर्षांपासून जनतेसाठी उपलब्ध
असणारा व प्रामाणिकपणे काम करणारा कर्तव्यदक्ष नगरसेवक / नगरसेविका
कोण? या आशयाखाली एक लिंक बनविण्यात आली असुन ती लिंक सर्वत्र
मुरबाड शहरातील जनतेच्या व्हॉट्सअप वर फिरत असून या लिंकमध्ये नागरिकांनी आपआपली पसंती
वोटींग करून दर्शविण्यास घेतली आहे.या वोटींग मध्ये चढ उताराने
मतांची टक्केवारी कर्तव्यदक्ष नगरसेवक/नगरसेविका ठरवित असल्याने
यामध्ये सर्वांच्याच परिचयातील असलेले व खरे अर्थाने आमच्यासाठी उपलब्ध असणारा म्हणून
नागरिकांनी या पोलच्या माध्यमातून पसंती दर्शविली ते म्हणजे नगरसेवक तथा मा.नगराध्यक्ष श्री.रामभाऊ दुधाळे.या पोलमध्ये सर्वच वार्डातील नगरसेविका,नगरसेवक यांची
नावे असून नागरिकांच्या मनात कोणी कामे चांगली केली आहे याचा अर्थ पकडण्यात येत असल्याची
चर्चा सध्या शहरात सुरू आहे त्यामुळे प्रत्येक वार्डात ही लिंक व्हॉट्सअपच्या माध्यमातून
फिरत असताना दि.25/09/2024 रोजी दुपारी 5 वा. नगरसेवक तथा मा.नगराध्यक्ष श्री.रामभाऊ दुधाळे यांना 19.64 टक्के (1,067 वोट) प्राप्त झाले
असल्याचे या लिंकच्या रिझर्ल्टमधून समोर आले आहे.सदर लिंकमध्ये
सर्वांना मिळून 5,291 वोटींग झाली असून सध्या तरी प्रामाणिकपणे
काम करणारा कर्तव्यदक्ष नगरसेवक / नगरसेविका कोण? या पोल सर्व्हे मध्ये रामभाऊ दुधाळे यांच्या कामाच्या पसंतीने नंबर
1 चा जनतेनी शेरा मारला आहे.काही नागरिकांशी संवाद
साधले असता नगरसेवक रामभाऊ दुधाळे यांनी त्यांच्या नगराध्यक्ष पद भूषिवण्यात आलेल्या
कार्यकाळात प्रामुख्याने शहरामध्ये पाणी टंचार्इ जाणवली होती तसेच भविष्यात पुरहाणी
शहारात होऊ नये म्हणून रामभाऊ दुधाळे यांनी यावर विशेष लक्ष वेधून नियंत्रण होण्याचे
महत्वपूर्ण कार्य केले असल्याचे सांगत वार्डासह शहारात कार्यसम्राट दमदार आमदार श्री.किसनराव कथोरे साहेब यांच्या आशिर्वादाने विकासाचे कार्य केले त्यामुळे आमच्या
हक्काच्या व्यक्तीमत्व कर्तव्यदक्ष नगरसेवकाला आमची पसंती आम्ही दर्शविली असल्याचे
आमच्याशी बोलतांना प्रतिक्रीया दिली आहे.
नगरसेवक तथा मा.नगराध्यक्ष रामभाऊ दुधाळे
यांच्यासह शहराच्या वार्डातील विकासात सौ.मानसी मनोज देसले(मा.नगराध्यक्षा तथा नगरसेविका,उपनगराध्यक्षा),श्री.मुकेश बबन विशे(नगराध्यक्ष),श्री.संतोष दिलीप चौधरी(नगरसेवक),श्री.अक्षय नंदकुमार रोठे(नगरसेवक),सौ.नम्रता नंदकुमार जाधव(नगरसेविका),सौ.उर्मिला सुजित ठाकरे टोले(नगरसेविका),सौ.मधुरा मोहन सासे(नगरसेविका)
यांच्यासह अन्य नगरसेविका,नगसेवक यांचे कार्य कौतुकास्पद
दैदीप्यमान भूमिका बजावणारी ठरली असून यांच्याही नावासमोर मतांसह टक्केवारीची आकडेवारी
त्यांच्या प्रामाणिकपणाच्या कार्याची दखल जनतेनी घेतली असल्याचे या पोल सर्व्हेतुन
सांगुन जात आहे.
Post a Comment