(दि.24,POL
- कुणाल शेलार,मुरबाड)
सरकारने गुटखा
विक्री बंदची घोषणा तर केली परंतु आजही गुटखा विक्रीचा उच्चांक कमी होणे ऐवजी वाढला
आहे.कालपर्यंत लपंडावी खेळ करणांरा गुटखा दलाल आज खुलेआम दोन नंबरी धद्दयाचा मालक
झालेला आहे.कालपर्यंत वचक होते आज भय नसल्याने सरकारच्या नियम
शिक्षेला जुमानत नसून हप्तीबाजीच्या नावाखाली आपला व्यसनी धंदा सुरू करून अनेकांच्या
घरातील दिव्यांना बुजविण्याचे महान कार्य करत आहे.संबंधित यंत्रणा
प्रभावी असतानाही हा गुटखा कुठुन व कसे त्याचा डिलर कोण या तपासापासून स्वतःला वंचित
ठेवित असून हप्तेबाजी घेत असल्याची दाट शक्यता आहे.वेळोवेळी याकडे
प्रसिध्दी माध्यम संबंधित विभागाच्या सदर भयावय बाब लक्षात आणून देत असून त्याकडे लक्ष
वेधले जात नाही आणि कालांतराने हा प्रश्न गुलदस्त्यात जातो.मुरबाड तालुक्यात गुटखा डिलर कोण हे शोधायला वर्षानुवर्षे जाते तरीही हाती
काहीच सापडत नसल्याचा देखावा केला जातो.यांच्या हातात काहीच लागेना
परंतु लहान वयाच्या व गुटखा खाऊन जीवाला आमंत्रण देणारे यांच्या हाती तारा,विमल सारखे गुटखे तात्काळ लागतात यालाच सक्षम विभाग असे म्हणायची वेळ आली आहे.मुरबाड शहरात महाविद्दयालय,शाळा असल्याने आजु बाजुच्या
परिसरात गुटखा विक्री जोमाने होत असल्याने शिक्षणासाठी गेलेला तो विद्दयार्थी वार्इट
संगतीने सिगारेट,गुटखा विक्री करणार्या
टपर्यांकडे वळतो याकडे शाळा व्यवस्थापकांचेही दुर्लक्ष असल्याचे
जाणकरांचे मत आहे.तारा गुटखासह विमलची पुढी सहज मिळू लागली असून
हा गुटखा हमखास कुठेही भेटत असून कारवार्इ मात्र शुन्य आहे.कारवार्इ
करण्याअगोदरच गुटखा डिलर यांना कळत असल्याने हप्तेबाजीचे कमाल सांगुन जात आहे.काही महिण्यांपुर्वी किन्हवली पोलीसांनी मुरबाडमध्ये एका गुटखा डिलरवर सापळा
रचून धाड मारली होती परंतु मुरबाडची यंत्रणांना गुटखा विक्री होते हे माहितीच नसल्याचे
आश्चर्य सर्व नागरिकांनी व्यक्त केले होते.गुटखा विक्री हा मुरबाडच्या तरूणार्इचे जीवन संपविण्यासाठी आणला जातो का असा
प्रश्न उपस्थित राहत असून कारवार्इचा बडगा गुलदस्त्यात पुजनला
आहे.तारा,विमल गुटखा डिलर हा आजही मोकाटच
खुलेआम दोन नंबरी व्यवसाय करित असून प्रशासकांचे हात त्याच्यापर्यंत कसे पाहोचत नाही
असा गंभीर प्रश्न येथील नागरिकांना पडला आहे.याचे तपास आता वरिष्ठांमार्फत करावा असे लेखी पत्र लवकरच करणार असल्याचे गोपनिय
सुत्रांकडुन कळाले आहे.या तपासात कोणता तारा,विमल गुटखा विक्री डिलरचा चेहरा समोर येतो व कोण कोण यात सहभागी आहे याचे उघड
सत्य लवकरच समोर येणार असल्याने याबाबत सर्वांनाच याची उत्सुकता असून मुरबाड तालुक्याचा
गुटखा कायमस्वरूपी बंद करावे अशी मागणी राज्यसरकारसह लोकप्रतिनिधी यांकडे करण्यात येणार
आहे.
Post a Comment