BIG BREAKING NEWS...

सौ.कमलताई किसन कथोरे महाविद्यालय म्हसा येथे 6 व्या वर्धापन दिनानिमित्त गुणवंत विद्यार्थी सत्कार सोहळा संपन्न...

 

दि,20,POL,कुणाल शेलार,मुरबाड -

जीवनदीप शैक्षणिक संस्था पोई संचलित सौ.कमलताई किसन कथोरे कला,वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय,म्हसा येथे महाविद्यालयाचा 6 वा वर्धापन दिन सोहळा मोठया उत्साहात साजरा करण्यात आला.त्यानिमित्ताने महाविद्यालयातील व मुरबाड तालुक्यातील दहावी व बारावी उत्तीर्ण गुणवंत विद्यार्थी तसेच विविध सामाजिक क्षेत्रावर कार्यरत असलेले विद्यार्थी यांचा सत्कार सोहळा पार पडला.

       कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून मुरबाड विधानसभा मतदार संघाचे आमदार श्री.किसनजी कथोरे,कल्याण तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती व जीवनदीप शैक्षणिक संस्था पोईचे अध्यक्ष रवींद्र घोडविंदे सर, रा.युवक काँग्रेस पार्टी ठाणे जिल्हाध्यक्ष प्रतीक हिंदुराव,मुरबाड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संदीप गीते,म्हसा महाविद्यालयाचे प्राचार्य श्री.योगेश माळी सर,त्याचबरोबर म्हसा पंचक्रोशीतील सन्माननीय सरपंच व प्रतिष्ठित ग्रामस्थ व पालक आदींची व्यासपीठावर उपस्थिती लाभली.

         कार्यक्रमाची सुरुवात श्रीगणेश पूजन,ईशस्तवन व स्वागत गीत गाऊन करण्यात आली.उपस्थित मान्यवरांचे व पालकांचे पुष्पगुच्छ देऊन महाविद्यालयातर्फे स्वागत करण्यात आले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक मांडताना महाविद्यालयाचे प्राचार्य श्री.माळी सर यांनी महाविद्यालयाची स्थापना ते आतापर्यंतचा कार्यकाळ सर्वांसमोर मांडला.संस्थेचे अध्यक्ष श्री.घोडविंदे सर यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना भरपूर शिकण्याचे व शिकून खूप मोठे होण्याचे आवाहन केले.त्यानंतर प्रतीक हिंदुराव व मुरबाड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संदीप गीते यांनी आपले मनोगत व्यक्त केले.कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे संस्थेचे मार्गदर्शक आमदार श्री.किसन कथोरे यांनी आपले आजोळ म्हणजेच म्हसा येथील तत्कालीन शिक्षण सुविधा व आत्ता महाविद्यालयात विद्यार्थ्यांना मिळणारी सुविधा यातील फरक स्पष्ट करून सांगितला.त्याचबरोबर आपल्या तालुक्यातील विद्यार्थ्यांची शिक्षणाच्या बाबतीत कोणतीही गैरसोय होऊ नये,यासाठी इतर शाखांतील शिक्षण घेण्यासाठी असे अनेक शैक्षणिक संकुल उभारण्याचे आश्‍वासनही उपस्थित विद्यार्थ्यांना दिले.त्यानंतर मुरबाड तालुक्यातील  व महाविद्यालयातील पदवीधर तसेच दहावी,बारावी प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा पार पडला.कार्यक्रमाची व्यवस्था व नियोजन महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक व प्राध्यापकेतर कर्मचारी यांनी केली.यावेळी सूत्रसंचालन प्रा.विजय सोनार व प्रा.कन्या हरड यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रा.अभिजीत वाघमारे यांनी मानले.कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने झाली.

 

Post a Comment

Previous Post Next Post