दि,20,POL,कुणाल शेलार,मुरबाड -
ठाणे जिल्हयातील मुरबाड तालुक्यातील न्हावे येथे रविवार दि.20/07/2025 रोजी नुतन ग्रामपंचायत कार्यालयाचे भव्य लोकार्पण सोहळा मोठया थाटामाटात पार पडला.या कार्यालयाचे उदघाटन प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्राचे लाडके,मुरबाड विधानसभा मतदार संघांचे आमदार किसन कथोरे यांच्या शुभहस्ते करण्यात आले.
यावेळी उद्घाटक म्हणून मा.सिडको अध्यक्ष प्रमोद हिंदुराव,मा.उपजिल्हाधिकारी,मुंबई चे यशवंत भालेराव, टिडीसी बँकेचे राजेश पाटील यावेळी वेळी उपस्थित होते.व्यासपीठावरील प्रमुख पाहुणे कृषी उत्पन्न बाजार समिती मुरबाडचे सरेश बांगर,नितीन मोहपे,रिपाईचे तालुकाध्यक्ष दिनेश उघडे,साजई तसेच सासणे ग्रामपंचायत सरपंच या मान्यवरांचे स्वागत न्हावे ग्रामपंचायतीचे सरपंच,उपसरपंच,सदस्य यांनी सर्व ग्रामस्थांच्या वतीने केले.
या सोहळयाला खास आकर्षण म्हणून माऊली सुरसंध्या भजन मंडळ, कान्होळ चे गायक संतोष देसले,वादक जगन शिंगोळे यांनी सर्व मान्यवर तसेच नागरिकांना मोहित करून सोडले.याप्रसंगी आमदार श्री.कथोरे यांनी या ग्रामपंचायतीचे नुतन कार्यालयाचे अभिनंदन करून शासनाच्या विविध योजना गोरगरिबांपर्यंत पोहोचवण्यात आपण यशस्वी व्हाल असा विश्वास संपादन करून लोकांची असलेली कामे मार्गी लावण्याचे सुचित केले त्याचबरोबर तालुक्यात वेगळेच अिाण चांगल्या प्रकारे ग्रामपंचायत कार्यालय झालं असल्याचे आपल्या संभाषणातुन मनोगत व्यक्त करित गावातील जमीनी शेतकर्यांनी विकू नका असा ग्रामस्थांना सल्ला दिला.
शहरीकरणापेक्षा आपल्या गावातील घर भारीच असून गावांत जे समाधान आहे ते कुठेच नसल्याचे आमदार श्री.कथोरे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.मुरबाड विधानसभेत 17,500 घरकुलं मंजूर झाली असून एकही लाभार्थी वंचित राहू देऊ नका असेही सुचित केले.गावाचा विकास हाच माझा ध्यास असून कशातही निधी कमी पडू देणार नाही,मागेल तेवढा निधी देण्यासाठी मी कटिबध्द असल्याचे यावेळी त्यांनी संवादतेतून सांगितले.
लातूर-बदलापूर माळशेज मार्गे रस्त्याला 17 हजार कोटीचा निधी मा.गडकरी साहेबांनी मंजूर केले असून ते काम दृष्टिक्षेपात आहे.वास्तु चांगली असली की,बसायला बरं वाटते,चारही बाजूने रस्त्याचे जाळे विनले असून विकासाची गती जोमाने पुढे जात असून केंद्र व राज्य सरकारने निधीची कमतरता कधीच कमी पडू दिली नाही असेही आपले मनोगत आमदार श्री.कथोरे यांनी आपल्या संभाषणातून ग्रामस्थांशी चर्चा करतांना व्यक्त केले आहे.
मुरबाड तालुक्यातील पोटगाव येथे मेडिकल महाविद्दयालय सुरू करण्यात येणार असून म्हसा येथिल सौ.कमलताई किसन कथोरे महाविद्दयालयात लवकरच नर्सिस महाविद्दयालय सुरू होणार असल्याचे याप्रसंगी सांगून आपला विद्दयार्थी इथंच शिकून इथंच घडून रोजगाराची संधी त्याला मिळाली पाहिजे आणि त्याचे उज्ज्वल भविष्याकडे वाटचाल झाली पाहिजे असेही मत यावेळी आमदार श्री.कथोरे यांनी यावेळी व्यक्त केले.
यावेळी उद्घाटन प्रसंगी न्हावे ग्रामपंचायत कार्यालयासाठी निधी उपलब्ध करून दिले तसेच मुरबाड तालुका कुठल्याच दृष्टिने कमी राहिलेला नसून आमदार श्री.कथोरे यांनी विकासाची धुर वाहून नेली असल्याने विकासाचा केंद्रबिम्दु म्हणून आज मुरबाड तालुका अव्वल स्थानावर गेला असल्याचे विकासकामांचे गुणगान मा.सिडको अध्यक्ष प्रमोद हिंदुराव यांनी गायिले आहे.
यावेळी प्रमोद हिंदुराव यांनी आपले मनोगतात ग्रामपंचायत हे विकासाचे मंदिर आजूबाजूला फार्महाऊस मोठया प्रमाणात झाले असून त्यांच्यासह इतर कारणास्तव परवानगी देतांना विचार करून कागदपत्र पडताळून परवानगी द्दयावेत असा मोलाचा सल्ला दिला.
शासनाच्या योजना दुर्बल घटकांपासून सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पाहोचविण्यासाठी सर्वांनी प्रयत्न केला पाहिजे असा विश्वासही यावेळी व्यक्त केला.यावेळी व्यासपिठावरील असलेले उल्हासभाऊ बांगर,प्रतिक हिंदुराव यांच्यासह अन्य मान्यवरांना आपले मनोगत व्यक्त केले.
या कार्यक्रम उद्घाटन सोहळयाला स्वामी यांच्यासह राजकीय,सामाजिक,समाजसेवक,पक्षाचे कार्यकर्ते यांच्यासह जेष्ठ नागरिक,नागरिक,महिला भगिनी,ग्रामस्थ मोठया संख्येने उपस्थित होते.
Post a Comment