BIG BREAKING NEWS...

माळशेजघाटात कार्यकर्ता मेळावा व स्नेहभोजन कार्यक्रम संपन्न ; माझा चष्मा खाली गेला असून अनेकांची हवा निघाली आहे - आमदार श्री.किसन कथोरे

 

दि,24,POL,कुणाल शेलार,मुरबाड -

मुरबाड तालुक्यातील माळशेजघाट येथे महायुतीचा कार्यकर्ता मेळावा व स्नेहभोजनाचा कार्यक्रम संपन्न झाला.या मेळाव्याला तब्बल 5 हजाराहून कार्यकर्ते यांची कुतूंब गर्दी पहायला मिळाली असल्याने गेल्या अनेक वर्षाचा सुरू असलेला हा सोहळा यावेळी ऐतिहासिक नोंद करणारा ठरला.यावेळी महाराष्ट्राचे लाडके कार्यसम्राट आमदार श्री.किसन कथोरे,राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष तथा मा.सिडकोध्यक्ष श्री.प्रमोद हिंदुराव यांच्यासह महायुतीचे सर्वच पक्षाचे तालुकाध्यक्ष,ज्येष्ठ,तरूण कार्यकर्ते,महिलांची मोठया संख्येने प्रमुख उपस्थिती होती.या कार्यकर्ता मेळाव्याचे प्रास्ताविक युवानेते अनिल घरत यांनी केले असता त्यांनी कार्यकर्ता यांना आपल्या मनेगतातून कार्यकर्ता सक्षम कसा असावा आणि पक्षाकरिता त्याचं महत्व काय आहे याबाबत मोलाचे मार्गदर्शन केले.या कार्यक्रमात श्री.हिंदुराव यांनी मुरबाड विधानसभेच्या विकास कार्याबाबत संपुर्ण रचना थोडक्यात मांडून आमदार श्री.कथोरे यांच्या विकासाची गती गतिमान असल्याचे सांगत कार्यकर्त्यांना त्यांच्या जबाबदारीची एकनिष्ठता पटवून दिली.अनेकांनी आपल्या मनोगतात आमदार श्री.कथोरे यांना मंत्री पद देण्यासाठी अग्रेसरची भूमिका यावेळी व्यक्त केली.यानंतर आमदार किसन कथोरे यांनी आपल्या संभाषणातुन महायुतीला निष्ठावंत कार्यकर्त्याची गरज असल्याचे सांगत 2009 सालाच्या अगोदरचा किचपट असलेल्या कारस्थानाचा लेखाजोखा मांडून गेल्या 15 वर्षात केलेला विकास नाविण्यजोगी असल्याचे सांगितले.अगोदर लोकांच्या मनात भिती होती हा आमदार आत टाकेल आणि एकाला सांगायचं कि आत टाका आणि आपल्याच माणसांना बाहेर काढायला सांगायचे परंतु हा आमदार श्री.कथोरे आत टाकणारा नाही तर बाहेर काढणारा आहे हा विश्‍वास नागरिकांमध्ये तयार झाला असे म्हणत विरोधकांना चोख प्रतिउत्तर या माध्यमातून दिले.

यातच आमदार श्री.कथोरे यांनी गद्दारांचा समाचार घेत बंडखोराना माझा चष्मा खाली गेल्याशिवाय चालणार नाही त्यामुळे हि निवडणूक झाल्यावर किसन कथोरे काय आहे हे त्यांना कळेल,गद्दारी ज्यांनी केली ते चांगलच झाल कारण मुरबाडची दिशा बदलण्यासाठीच घडलं आहे,बदलापूरला तर माझा चष्मा खाली जायाला सुरूवात केली आहे,टाटाचं मी तिथं बाटा करून ठेवणार आहे,ज्यांनी त्रास दिलायं ते सरळ ठेवून चालणार नाही ते वाकडचं करून ठेवावं लागेल,मी कधीही कोणाच्या विरोधात बोलत नसतो,15 वर्षापूर्वीची परंपरा मी मोडलेली आहे,आमदाराला भेटल्याशिवाय काम मिळणार नाही,आमदाराला पाहोचल्याशिवाय काम मिळणार नाही,परंतु आज कुठल्याही ठेकेदाराने सांगाव की,किसन कथोरेच्या गाडीमध्ये कधी डिझेल भरला आहे का,मी उलट त्यांना चहा पाजत असतो,कामं कोणीही करावं परंतु ते काम झालं पाहिजे हा महत्वाचा माझा पैलू असतो.येणार्‍या कालावधीत आपण तिर्थक्षेत्र संगम उभा करित असून माळशेजघाटात काचेचा स्कायवॉक आपण बांधत आहोत,हरिश्‍चंद्र गड येथे रोप वे करत असून कोणाला काहीच माहिती नसून त्याबाबत ज्ञान कमीच असल्याने मनाला काहीपण येल ते बोलतात आणि मी जे बोलतो ते करूनच दाखवितो असे म्हणत माझा चष्मा खाली गेला असून अनेकांची हवा निघाली आहे.ज्यांनी गद्दारी केली त्यांचा करेक्ट कार्यक्रमाला सुरूवात झाली असून विश्‍वास करणार्‍यामध्ये विषाचा वास असतो असे मार्मिकपणे म्हणत विरोधकांना असा सज्जड इशाराही यावेळी आमदार श्री.कथोरे यांनी यावेळी दिला आहे.येणार्‍या निवडणूका हृया कार्यकर्त्यांची असून महायुतीच्या उमेदवाराला आपल्याला निवडूण आणायचं आहे त्यामुळे जो प्रामाणिक एकनिष्ठ असले त्यांनी आत्ताच कामाला लागा,आणि ज्याला गरज नसेल,जो गद्दार होणार असेल त्यांनी आत्ताच बाजूला झालं तरी फरक पडणार नाही असा सल्लाही यावेळी आमदार श्री.कथोरे यांनी दिला.

आजचा मेळावा हा गेल्या अनेक मेळाव्यापेक्षा प्रभावी आणि अविस्मरणीय ठरला असल्याने हजारो कार्यकर्त्यांनी या मेळावा स्नेहभोजनला आपली उपस्थिती दर्शविली होती.या वेळी महाराष्ट्राचे लाडके कार्यसम्राट आमदार श्री.किसन कथोरे,राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष तथा मा.सिडकोध्यक्ष श्री.प्रमोद हिंदुराव,टीडीसी बँकेचे संचालक श्री.राजेश पाटील,बदलापूर मा.नगराध्यक्ष श्री.घोरपडे,शिवसेनेचे तालुकाध्यक्ष कांतीलाल कंटे,रिपा चे तालुकाध्यक्ष दिनेश उघडे,राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष श्री.बोस्टे,भाजपाचे ठाणे ग्रामीण जिल्हाध्यक्ष श्री.डाकी,बदलापरचे श्री.शरद तेली,श्री.बंटी म्हसकर,ज्येष्ठ नेते उल्हासभाऊ बांगर,कल्याण तालुकाध्यक्ष श्री.लोणे,बदलापूर मंडळाध्यक्ष श्री.सोळशे,किरण भोर,कृषी उत्पन्न बाजार समिती कल्याणचे सभापती श्री.रविंद्र घोडविंदे सर,भाजपा मुरबाड तालुका उपाध्यक्ष एकनाथ पोगेरे,मुरबाड पूर्व तालुका ग्रा.मंडळ अध्यक्ष दिपक पवार,मुरबाड पश्‍चिम तालुका ग्रा.मंडळ अध्यक्ष जितेंद्र भावार्थे,युवानेते अनिल घरत,सुहास मोरे,नितीन मोहपे सर,कृषी उत्पन्न बाजार समिती मुरबाडचे सुरेश बांगर सर,जयवंत कराळे सर,टीडीसी बँकेचे सेवानिवृत्त व्यवस्थापक श्री.घुडे सर,मा.नगराध्यक्ष मुकेश विशे,मोहन सासे, अ‍ॅड.सचिन चौधरी,समाजसेवक मनोज देसले,मा.सभापती सौ.स्वराता सचिन चौधरी,उद्दयोजक तथा समाजसेवक मयुर ऐगडे,ज्येष्ठ मधूकर ऐगडे,श्री.रूपेश गुजरे,सागर कार्ले यांच्यासह पत्रकार श्री.संजय बोरगे,श्री.शंकर करडे,श्री.दिलीप पवार,श्री.कुणाल शेलार,श्री.दत्ता माळवे,श्री.सचिन पोतदार,श्री.किशोर पवार,विलास जाधव यांच्यासह हजारो कार्यकर्ते,पदाधिकारी,युवक महिला मोठया संख्येने उपस्थित होते.

 

Post a Comment

Previous Post Next Post