दि,27,POL,कुणाल शेलार,मुरबाड -
मुरबाड तालुका कुणबी समाजोन्नती मंडळ आयोजित विद्दयार्थ्यांचा गुणगौरव व सन्मान सोहळा 2025 कार्यक्रम आज कुणबी समाज हॉलमध्ये संपन्न झाला यामध्ये मुरबाडच्या कुणबी समाजाचे कर्तृत्वान विद्दयार्थ्यांचा सन्मानचिन्ह देऊन त्यांना सन्मानित करण्यात आले.या सन्मान सोहळयाला कुणबी समाजाचे बुलंद आवाज,कणखर,प्रभावशाली,आधारस्तंभ आधारवड नेते कार्यसम्राट आमदार श्री.किसन कथोरे,मा.आमदार श्री.गोटीरामभाऊ पवार यांची व्यासपिठावर प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी या कार्यक्रमाची सुरूवात दिपप्रज्वलानी झाली.त्यानंतर व्यासपिठावरील मान्यवरांनी विद्दयार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले.यामध्ये या कार्यक्रमाचे अध्यक्ष मा.आमदार.श्री.पवार यांनी विद्दयार्थ्यांना मार्गदर्शन करित आपले जीवन हे कष्टमय असले पाहिजे त्यामुळे पुढे जातील.आपली परिस्थिती काय आहे याची जाण ठेवून आपण पुढे गेलो पाहिजे,आपण जिद्द,चिकाटी सोडू नका कारण गरूड झेप घेत ज्या शिखरावर आपल्याला पोहोचायचा आहे तेथे रात्रंदिवस काम पराकष्ट केले पाहिजे असा मोलाचा सल्ला दिला.
तसेच आमदार श्री.कथोरे यांनी आपल्या संभाषणात कुणबी समाजातील तरूणांना मार्गदर्शन करित तरूणांनी पुढे घडत असताना थोडं मगे पाहत रहा,समाजच आपल्या पाठिशी उभा राहतो,शिकूण शहराकडे जाणारे मी कुणबी असे सांगत नसून त्यांना कुणबी असल्याचे सांगायला पण लाज वाटत आहे,अलीकडे आपल्यावर आघात आहे त्यामुळे आपण ठामपणे कुणबी असल्याचे अभिमानाने सांगायला हवंय,एक चांगल्या पध्दतीने समाजाची दिशा देणारे काम आपण केलं पाहिजे,मी जन्मलो कुणबी,वाढलोय कुणबी,घडलोय कुणबी,राहणारही कुणबीच अशा स्वरूपात संवाद साधले.तसेच पायातील चपला बाजुला काढून कुणबी समाजातील सर्वांनी विश्वासात घेऊन चालायला शिकलं पाहिजे.आज आपल्या शहापूर येथिल कुणबी समाजाचा युवा सैनिक भारत पाकिस्तानच्या युध्दात सिंधूर मिशनमध्ये होता त्याने आपल्या भारतासाठी जे कार्य केले ते गौरवास्पद असून मला आपल्या सैनिकाचा सार्थ अभिमान असून त्याहून तो कुणबी समाजाचा असल्याने त्यानी केलेल्या धाडसी कार्याने भारताची ताकद आमच्या युवा सैनिकांची काय असते ते पाकिस्तानला दाखवून दिले आहे.
आपल्या कुणबी समाजातील ज्या मुलांचे पितृछत्र हरपले असेल,ज्या मुलांना डिग्रीपुढचं शिक्षण घ्यायचं असेल अशांना कुणबी समाजाची एक पेन्शन योजना सुरू करा असे आमदार श्री.कथोरे यांनी कुणबी समाजोन्नती मंडळाचे अध्यक्ष श्री.गणपत तात्या विशे यांना याच व्यासपिठावरून सुचित करून तालुक्याची एक यादी तयार करा त्यांना लागणारा जो काय निधी द्दयायच आहे तो ठरवून द्दया,जी जबाबदारी असेल ती सर्व कुणबी समाजाचे आपण एकत्र येऊन पार पाडू.निधी किती लागेल ते सांगा सर्वानुमते जमा होईल यामुळे एक चांगला विचार समाजात गेला पाहिजे.शिक्षणाचं संकट असेल तर ते संकट दूर करण्यासाठी कुणबी समाजाने आता पुढं यायला हवयं.परंतु काही बाबतीत परिस्थिती बदलत चालली असून इथं तर आपलेच कुणबी कुणब्यांच पाय खाली खेचत आहे.
कुणबी असल्याने कुणब्यांनी कुणब्याचे पाय ओढल्याने मी मंत्री झालो नसल्याची खेदाची भावना यावेळी व्यक्त केली.मी मंत्री असो वा नसो मला काहीही फरक पडत नाही कारण मला तुम्ही घडविले आहे आनि चांगल्या विचाराने माझी विकासकामे करित आलो आहे.आपल्या समाजात दुसर्यानी कान फुकले तर लवकर एैकायला येतो आणि आम्ही सांगितले तर सहन होत नाही,लगेच बोलतील की माझ्या बाबतीत बोलतोय.
गेल्या 15 वर्षात माझ्या तोंडातून कधीच शब्द काढला नाही,आदरानीच वागतोय,आदरानीच राहिलोय आणि आदरानीच जगेल.मला कधी कधी खेद वाटतो की दुसरे येऊन कान भरतात आणि आमच्यात भांडणं लावतात त्यामुळे हे कुठं तरी थांबल तरच आपला समाजाने पुढचा मतदार तयार होईल असे समजनेवाले को आपल्या मार्मिक संभाषणातुन आमदार श्री.कथोरे यांनी पाय ओढणार्यांचा चांगलाच समाचार घेऊन पटेल असाच सल्ला दिला आहे.या सन्मान सोहळयाला कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून मा.आमदार श्री.गोटीरामभाऊ पवार,प्रमुख मान्यवर म्हणुन मुरबाड विधानसभेचे कार्यसम्राट आमदार श्री.किसन कथोरे यांच्यासह व्यासपिठावर मुरबाड तालुका कुणबी समाजोन्नती मंडळाचे जयराम पडवळ,मधुकर मोहपे,शांताराम बांगर,उल्हासभाऊ बांगर,सुभाष घरत,पांडुरंग कोर,पडवळ आप्पा,रामभाऊ दळवी,आत्माराम सासे,परशराम भोईर,सदानंद मोरे,दिपक पवार,सुभाष कडव,मुकेश विशे,लक्ष्मण सरनिंगे,सुरेश बांगर सर,लेखक तथा दिग्दर्शक एकनाथ देसले सर,सौ.गोडांबे ताई यांच्यासह कुणबी समाजाचे प्रमुख महिलावर्ग,विद्दयार्थी यांच्यासह पालकवर्ग अशा मोठया संख्येने कुणबी समाज उपस्थित होते.या कार्यक्रमाचे आयोजन चांगल्या पध्दतीने केल्याने प्रमुख पाहुणे,मान्यवरांकडून कुणबी समाजोन्नती मंडळाचे अध्यक्षांसह सर्व कमिटी सल्लागार मंडळ सदस्यांचे अभिनंदन करण्यात आले.
Post a Comment