BIG BREAKING NEWS...

समाजसेवक प्रथमेश सावंत यांनी काढलेल्या आरती संग्रह पुस्तकाचे आमदार किसन कथोरे यांच्या हस्ते प्रकाशन

 

दि,25,POL,कुणाल शेलार,मुरबाड -

मुरबाड शहरातील शेळकेपाडा येथील गरिब घरात जन्म घेतलेल्या व स्वाभिमानाने निसंकोच,निस्वार्थपणे सामान्यांची सेवा करण्याचे ध्येय मनाशी बांधून समाजसेवा करणारे प्रथमेश सावंत यांनी अल्पवधीतच नागरिकांची मने जिंकून घेतली आहेत.स्वकष्टाने घर चालवून त्याच कष्टाच्या घामातून 2 पैसे समाजकल्याणासाठी खर्च करणारे प्रथमेश सावंत यांनी अनेक संघर्ष करून वैभव निर्माण करायला सुरूवात केली आहे.शिवभक्त प्रतिष्ठाण मध्ये त्यांनी केलेल्या स्तुत कामगिरीचे मुरबाडकर साक्षीदार राहिले आहेत.मुरबाड शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे दररोज होणारी शिवआरती सुरू झाली तेव्हा प्रथमेश सावंत यांचाही पुढाकार होता याचे विसर आजही कोणाला पडलेले नाही.आपला उदरनिर्वाह हा हातावरचा पोटभरून करित असताना आपल्या रिक्षा चालकातून त्यांनी अपंग दिव्यांग व्यक्तीसाठी मोफत रिक्षा सेवा दिली आहे त्यावेळी त्यांचे कौतुक जिल्हयाच्या नकाशावर कोरले गेले होते.

आज त्या नकाशाचा कोहिनूर प्रथमेश सावंत यांनी गौरी गणपती सण आल्याने आर्थिक परिस्थिती चांगली नसतानाही स्वःखर्चातून नागरिकांना आरती संग्रह पुस्तक घराघरात मिळावे म्हणून सदर पुस्तक प्रकाशित केले असून या पुस्तकाचे प्रकाशन कार्यसम्राट आमदार किसन कथोरे यांच्या हस्ते कस्तुरी निवासस्थानी करण्यात आले.यावेळी आमदार श्री.कथोरे यांनी या समाजसेवक प्रथमेश सावंतचे कौतुक करून त्याला शुभेच्छा दिल्या.या पुस्तक प्रकाशन सोहळयाला आमदार किसन कथोरे,मा.जिप.सदस्य उल्हासभाऊ बांगर,टिडीसी बँकेचे संचालक राजेशदादा पाटील,मा.नगराध्यक्ष किसन अनंत कथोरे,मुकेश विशे,कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक सुरेश बांगर सर,खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष संतोष पवार,मंडळाध्यक्ष जितेंद्र भावार्थे,सुहास मोरे,खरेदी विक्री संघाचे संचालक मिलींद (बबलू)मडके यांच्यासह कार्यकर्ते मोठया संख्येनी उपस्थित होते.

 

Post a Comment

Previous Post Next Post