दि,16,POL,कुणाल शेलार,मुरबाड -
रेनबो सनराईज इंग्लिश मिडीयम स्कूलचे संस्थापक अध्यक्ष पंढरीनाथ टोले सर यांचे 15 ऑगस्ट स्वातंञ्य दिनी वाढदिवस असतो.याच वाढदिवसानिमित्त दरवर्षी आगळा वेगळा उपक्रम राबविण्यात येत असतो.मागील वर्षी आमदार किसन कथोरे यांनी आपली उपस्थिती दर्शवून श्री.पंढरीनाथ बुधाजी टोले यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत त्यांच्या शुभहस्ते गोरगरिब आदिवासी बांधवांना अन्न धान्याचे वाटप केले होते तीच परंपरा कायम ठेवून या प्रेरणास्थान व मार्गदर्शक यांच्या मार्गदशनाने या वर्षी वाढदिवसाचे औचित्य साधत माणूसकी झरी जपण्याचा कार्यक्रम घेण्याचा ठरविला असताना जिल्हापरिषद गट देवगाव अंतर्गत येणार्या देवगांव,देवपे,धानिवली येथील आदिवासी महिला भगिनींना साडयांचे वाटप करण्यात आले.
या कार्यक्रमाला आमदार किसन कथोरे हे प्रमुख पाहूणे होते परंतु बदलापूर येथील कार्यक्रम मोठया प्रमाणात असल्याने त्यांना या कार्यक्रमाला उपस्थित राहता आले नाही त्यामुळे त्यांनी श्री.पंढरीनाथ टोले सरांना फोन करून फोनद्वारे शुभेच्छा दिल्या.या कार्यक्रमाला कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक सुरेश बांगर सर यांच्यासह अनेक राजकीय, सामाजिक कार्यकर्ते पदाधिकारी मंडळीनी मात्र श्री.टोले सरांना आपली उपस्थिती दर्शवून त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.
श्री.टोले सरांबद्दल विशेष सांगायचं झालं तर
त्यांनी गरिबातील गरिब मुलांनी शिक्षण घ्यावं म्हणून ऋणानुबंध सामाजिक संस्थेच्या माध्यमातून
रेनबो सनराईज इंग्लिश मिडीयम स्कूलची स्थापना केली.ज्या पालकांची परिस्थिती बिकट
होती त्यांच्या मुलांकरिता माफक फीमध्ये प्रवेश दिला आणि आज हीच शाळा शासनाच्या बेस्ट
स्कूलच्या यादीत आली आहे.या शाळेतील विद्दयार्थी घडविण्यात श्री.टोले सरांसमवेत शिक्षक
वर्गांनी घेतलेली मेहनत डोळयासमोर उघडं पुस्तक आहे.आपण शेतकरी घरातील कष्टकरी शेतकर्याचं
मुल आहोत याची जाण ठेवून माणूसकी झरी जपत नैतिकता आजही जपली आहे.कधीही कोणाला नाराज
न करणं व नेहमी हसरा चेहरा चेहरा हा प्रभाव पाढणारा गुणधर्म श्री.टोले सरांमध्ये असून
अनेक पालकांनी त्यांच्या शाळेला पसंती दर्शविली.त्यापलिकडे जाऊन त्यांचे योगदान प्रत्येक
गरजूंना मदतकर्ता म्हणून लाभले आहे.पालकांकडे देण्यासाठी फी नाही म्हणून इतरांसारखं
कधीही विद्दयार्थ्यांचं शिक्षण थांबवलं नाही,आई वडिल,बहिण,भाऊ,दादा,म्हणून त्यांची
साद सर्वांना भावूक करणारी ठरते.आजही श्री.टोले सरांना जिल्हापरिषद गटात असलेल्या गावात
मोठया मनाने सन्मान मिळत आहे.अनेक ठिकाणी तर त्यांना राजकारणात येऊन अशीच जनसेवा करून
विकासाचे वादळाच्या आशिर्वाने विकास करावा म्हणून विनंत्या केल्या जातात.ज्याच्याकडे
काही नसताना स्वःखर्चाने जनतेची सेवा करतो अशा व्यक्तीमत्वाने राजकारणात का पडू नये
म्हणून जनताच्या प्रतिक्रिया येत आहेत.त्यातच कार्यसम्राट आमदार किसन कथोरे यांच्या
अत्यंत जवळचे मानले जाणारे पंढरीनाथ बुधाजी टोले यांना कधीच साहेबांकडून नकार आलेला
नाही याचे अनेक जण साक्षीदार आहेत त्यामुळे नक्कीच साहेबांनी त्यांच्या माणलेल्या मानस
पुत्रासाठी काहीतरी विचार केलेला असावा असे जाणकार म्हणत आहेत.त्या आज श्री.टोले सरांचे
वाढदिवस असून त्यांनी जे समाजकार्य केले त्याबद्दलचा कौतुकाचा वर्षाव व त्यांच्यावर
शुभेच्छांचा वर्षाव सर्वत्र स्तरातून होत आहे.




Post a Comment