BIG BREAKING NEWS...

राजेशदादा पाटील यांनी दिल्या तमाम जनतेला श्रीकृष्ण जन्माष्टमी गोपाळकालाच्या शुभेच्छा...

 

दि,16,POL,कुणाल शेलार,मुरबाड -

आज श्रीकृष्ण जन्माष्टमी गोपाळकाला असून सर्वत्र राज्य देशभरात दहीहंडी उत्सव मोठया थाटामाटात पार पडत असून हजारो गोविंदा पथक आज जोशाने थर रचून सलामी देत हा पारंपारिक उत्सव साजरा करतांना दिसत आहे याचेच औचित्य साधून टिडीसी बँकेचे संचालक राजेश पाटील यांनी तमाम गोविंदापथक तसेच समस्त भाविक नागरिकांना श्रीकृष्ण जन्माष्टमी व गोपाळकालाच्या शुभेच्छा या माध्यमातून दिल्या आहेत.त्याचबरोबर दहीहंडी फोडतांना जे थर लावून सलामी देणार्‍यांना काळजीपूर्वक राहून हा आपला उत्सव मोठया थाटामाटात साजरा करावा असे आवाहन केले आहे.राजेश पाटील यांचे अनेक वेळा पारंपारिक सणात उपस्थिती असते,अनेक दहीहंडी उत्सवाला त्यांचे भरघोष बक्षिसे असतात परंतु काही कारणास्तव बाहेर असल्याने काही ठिकाणी त्यांची पहिल्यांदाच अनुपस्थिती असल्याने त्यांनी या माध्यमातून सर्व गोविंदा पथकांना शुभेच्छा दिल्या आहेत.

Post a Comment

Previous Post Next Post