BIG BREAKING NEWS...

भारत वॉईन शॉपचा अधिकार्यांवर हप्तेबाजीचा आशिर्वाद असल्याने कारवाई शून्य; तक्रारदाराने घेतला अखेर उपोषणाचा पावित्रा...

 

दि,26,POL,कुणाल शेलार,मुरबाड -

मुरबाड शहरातंर्गत शाळेसमोर,मंदिराच्या ठिकाणी,रहदारी वस्तीत गेल्या 2003 सालापासून मुरबाड नगरपंचायत इमारतीच्या खाली भारत वॉन शॉप हा खुलेआम बनवाटी दारू विक्री करित असल्याच्या चर्चेला उधान आले होते.त्यानंतर अनेकांनी पत्रव्यवहार केले आणि मॅनेज झाले.काही महिण्यापूर्वी तर याच भारत वॉन शॉपला शहराबाहेर हलविण्यासाठी एकमताने ठरावही झाला होता परंतु राजकीय वरदहस्ताने आणि अधिकारी यांना मन्नुभाकडून मिळणार्‍या हप्तेबाजीच्या आशिर्वादाने कारवा मात्र धुळखात पडून राहिली.कालांतराने याच भारत वॉन शॉपवर राज्य उत्पादनाची चौकशी धाड पडते आणि मालक मन्नुभा धापा टाकत त्याच्या दुकानात येतो.तब्बल 2 तासाच्या चौकशीनंतर आकडेवारीत मॅनेज झाल्याचे गुढ कायम राखून अधिकारी यांना पत्रकारांनी विचाराणा केली असता उडवा उडवीची उत्तरे देऊन पळ काढला.एका तक्रारदाराने या भारत वॉन शॉपचा जुना व नवा रेकॉर्ड अधिकारी यांच्या समोर ठेवूनही गेल्या काही महिण्यांपासून कारवाचा शिमगा फुंकला गेला नसल्याने एमपीडीए अंतर्गत अद्दयाप गुन्हा दाखल करण्यात आलेला नसून नगरपंचायत अधिकारी यावर जाणून बुजून लक्ष घालत नसल्याने अनेकांसह तक्रारदाराच्या संशयाच्या नजरा भुया काढू लागले आहे.राजकीय वरदहस्तानी अनेकांना हप्तेबाजीत बांधून ठेवल्याने मोफतची दारूचा महिणा हप्ता अनेकांना मिळत असल्याचे जाणकरांमध्ये बोलले जात आहे.याच भारत वॉन शॉपची संत्रा नावाची देशी दारू अनेक टपर्‍यांमध्ये मिळत असल्याने बेकायदेशीरपणे देशी दारूची विक्री मालक मन्नुभा यांच्याच संमतीने आणि संगणमताने होत असल्याची दाट शक्यता वर्तवली जात असून सदर वॉन शॉप कोणत्या निकष व कागदोपत्री पुराव्याच्या आधारावर चालू करण्यासाठी दिले? भारत वॉन शॉप शहराबाहेर हलविण्यासाठी झालेला ठराव कुठे गायब झाला तसेच काय कार्यवाही करण्यात आली याचे उत्तर अधिकारी देत नसून या भारत वॉन शॉपला चालविण्यासाठी अधिकारी यांचेही संगणमत असल्याचा संशय आहे.मुरबाड नगरपंचायत इमारतीच्या खाली भारत वॉन शॉप असल्याने दर दिवसाआड दारूचा साठा येत असल्याने याच नगरपंचायतीच्या इमारतीखाली दारूचा साठा भारत वॉन शॉप साठवणूक करून ठेवतो परंतु भविष्यात आग लागल्याने नगरपंचायतीमधील नागरिकांचे तसेच गोपनिय असलेले महत्वाचे कागदोपत्री जळण्याची शक्यता नाकारली जात नसून हे मुरबाड नगरपंचायतीला माहिती असून सुध्दा तक्रारदारानी याच मुद्दयाची लेखी तक्रारीत पुराव्याबरोबर आठवण करून देऊन सुध्दा अद्दयापही कोणतीच कारवा मुरबाड नगरपंचायतकडून करण्यात आलेली नाही.त्यातच कर वसुली करण्यासाठी नगरपंचायत प्रथम स्थानी येत असल्याने याच भारत वॉन शॉपनी बोगसपणे केलेला प्रकार समोर आणूनही तक्रारदाराला फिरविण्याचे काम आजपर्यंत करित आली आहे.शाळा जवळ असल्याने याच रहदारी वस्तीतुन लहान मुलं मुली प्रवास करतात आणि अशातच 200 मीटरच्या आत असलेला या वॉन शॉपवर सकाळी 9 वाजल्यापासून मद्दाधुंदी करणारे मद्दयप्रेमी यांची हजेरी लागते.त्यामुळे अनुकुचित प्रकार घडल्यास कोणता प्रशासन यावर कारवा करेल असा प्रश्‍नच आता जनतेला पडला आहे.गेल्या काही वर्षात याच भारत वॉन शॉप जवळ हाणामारीचे प्रकार घडले असून याच वॉन शॉपमध्ये एका व्यक्तीवरही हाणामारी झाली होती त्यानंतरही प्रशासन जागे झाले नसून फुकटची दारू मिळाल्याने कारवा होण्याचा संभव कसे व्यक्त केला जाऊ शकतो असे जाणकरांचे मत असून अनेकांच्या कार्यक्रम उत्सवाला भारत वॉन शॉपची देणगी भलीमोठी असल्याने भारत वॉन शॉपला अनेकांचे प्रेम प्राप्त झाले आहे.राजकीय वरदहस्तांना आमच्या माध्यमातून विनंती आहे की,चांगल्या कार्याला साथ द्दयावी आणि तक्रारदाराला सहकार्य करून कृपया करून या चौकशीत विघ्न आणू नये असा आमचा प्रामाणिक सल्ला आहे.कोणी फिरायला जायाचे झाले तर भारत वॉन शॉपकडे प्रस्थान करते आणि त्यांना हजारो रूपयाचा आशिर्वाद दिला जातो अशी चर्चा आता शहरात होऊ लागली असल्याने जशी अमली पदार्थ,गुटखा बंदी करण्यासाठी रॅली काढली तशीच एक रॅली हा भारत वॉन शॉप बंद काढण्यासाठी काढल्यास अनेक मद्दयप्रेमी व्यसनापासून मुक्त होतील आणि हेच सत्य आहे.त्यामुळे तक्रारदार यांनी केलेल्या पत्रव्यवहाराला अधिकारी वर्ग दाद देत नसल्याने भिजतघोंगडे ठेवलेल्या या प्रकरणात थेट राज्याचे पारदर्शक,सक्षम,कुशल,मुख्यमंत्री महोदयांनी याकडे लक्ष वेधून या भारत वॉन शॉपला मुरबाड नगरपंचायतीच्या एकूण 17 प्रभागाच्या बाहेर हलवून व्यवसाय करण्याचे आदेश द्दयावेत म्हणून तक्रारदार थेट मंत्रालयाच्या दालनात सविस्तर पुराव्यानिशी लोकशाही मार्गाने आमरण उपोषणाचा पावित्रा येत्या 5 सप्टेंबर 2025 रोजी घेणार असल्याने लवकरच लेखी पत्र मंत्रालयाच्या दालनात जाऊन कारवा करण्याची मागणी करणार आहे.

 

 

Post a Comment

Previous Post Next Post