दि,17,POL,कुणाल शेलार,मुरबाड -
गेल्या काही दिवसांपूर्वी
महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री यांच्यासह संबंधित विभाग अधिकारी यांना मुरबाड येथील
एका हॉस्पिटलमे ईएसआयसी मध्ये 7 ते 8 कोटीचा घोटाळा करून बनावट रिपोर्ट दाखवून भ्रष्टाचार
केला असल्याचे जाणकरांचे मत असून त्यावर तक्रारदाराने संशय व्यक्त केला आहे म्हत्वाचं
म्हणजे सन 2022 सालापासून केंद्र ते महाराष्ट्र सरकार येथे सर्वतोपरी तक्रार तक्रारदाराने
केली असताना त्यावर अद्दयाप घोटाळा अद्दयाप संबंधित अधिकारी यांनी उघड केलेला नाही.त्यानुसार
15 ऑगस्ट रोजी मंत्रालयाच्या दालनासमोर अखेर तक्रारदारानी उपोषणाचा इशारा देताच संबंधित
विभाग अर्थात महाराष्ट्र राज्य कामगार विमा सोसायटी,मुख्य कार्यकारी अधिकारी वरळी यांचा
कोकण आयुक्त तसेच जिल्हाधिकारी ठाणे यांचे पत्र गेले असल्याचे कळते त्यानुसार वरळी
मुंबई येथून सदर एकाच हॉस्पिटलवर तक्रारीच्या अनुषंगाने समिती गठित करण्यात आली होती
त्यानुसार चौकशी करून अहवाल सादर करण्याचे पत्रही उल्हासनगर येथील विभागाला निघाले.परंतु
3 दिवसांत अहवाल चौकशी न करता तक्रारदाराला पत्र काढून त्यांच्याकडून कागदोपत्री पुरावे
मिळवण्याचा डाव रचून पत्र काढून सुनावणी घेण्यात आली.यावर तक्रारदारानेही सुनावणी येथे
आपली हजेरी लावून सदर प्रकरणात आपण तक्रारदारालाच आरोपी म्हणून बोलवून घेतले परंतु
संबंधित सर्व ईएसआयसी हॉस्पिटलची चौकशी केलेले नाही यावर संशय व्यक्त केला गेला.तक्रारदाराकडून
सर्व कागदोपत्री माहिती घेऊन सखोल चौकशी करण्याचे आश्वासन समितीचे प्रमुख वैद्दयकीय
अधिकारी श्री.डोंगरे यांनी दिले असताना तक्रारदारांनी या सुनावणी दरम्यान पत्रातील
मुळ सारांश पटवून सांगितले असता तक्रारदारानी देखील त्यांना लेखी जबाब दिला परंतु एैन
चौकशीवेळी समितीने अहवाल वरिष्ठांना खोटा सादर केला असल्याचे अहवाल सादरीकरणातून दिसून
येत असल्याने कालांतराने कळून आले की ईएसआयसी हॉस्पिटलचे बिल अदा हेच करित आहेत त्यामुळे
या चौकशी अहवालावर तक्रारदारानी खोटा अहवाल असल्याची दाट शक्यता वर्तवली असल्याने त्या
अहवालात वेगळेच म्हणणे संबंधित हॉस्पिटलचे एैकून त्यांच्या बाजूने सांगेल तसे अहवाल
खोटा बनवून संगणमत असलेला आमचा संशय सत्तेत आणला असल्याने हा अहवाल खरे च्या बाजूने
लावण्यात आला आहे म्हणून अधिकारी वर्गांना टक्केवारी कशी मिळते याचे उत्तरच सामोर मिळाले
आहे.परंतु यावर तक्रारदार येथेच थांबले नसून त्या खोटा अहवालाचा आधार घेत थेट आता या ईएसआयसी घोटाळयाची चौकशी ईडी व एटीस विभागाने करावी तसेच वरळी,उल्हासनगर येथील अधिकारी तसेच त्या मुरबाडच्या ईएसआयसी हॉस्पिटलसह त्या डॉक्टर यांच्या संपत्तीची चौकशी आर्थिक गुन्हे शाखा यांने
करावी अशी तक्रार तक्रारदाराने लेखी पत्रान्वये करण्यासाठी तयारी केली आहे.मुळ पत्राच्या
आधारावर खोटा अहवाल खरे च्या बाजूने लावण्यात आल्याने सदर ईएसआयसी घोटाळा मुद्दा
लवकरच महाराष्ट्रात चर्चेत येणार आहे.जर राजकारणी लोकांना 5 ते 10 कोटीच्या घोटाळावर ईडी,एटीएस लागू शकते तर या ईएसआयसीमधील 7 ते 8 कोटीच्या घोटाळावर लागणं तर शक्यच
आहे.याकरिता असलेले कागदोपत्री सर्व पुरावे,सीडीआर,ऑडीओ क्लीप ईडी आणि एटीएस विभागाला
तक्रारदार लवकरच सादर करणार असल्याचे सांगितले असून ते पुरावे आमच्या मिडीयाकडे सादर
केलेले आहे.

Post a Comment