दि,17,POL,कुणाल शेलार,मुरबाड -
ठाणे जिल्हयाचे नवनिर्वाचित डॅशिंग,धडाकेबाज जिल्हाधिकारी श्री.श्रीकृष्ण पांचाळ यांनी अचानक मुरबाड तालुक्याकडे पाहणी द्वौरा केला आहे.विशेषतः आज रविवारी सुट्टी असताना त्यांचा पाहणी द्वौरा चर्चेत राहिला आहे.पहिल्यांदाच त्यांनी मुरबाड तालुक्याला सदिच्छा भेट दिली असून मुरबाड तहसिलदार कार्यालयालाही त्यांनी भेट दिली.
यावेळी त्यांचे मुरबाड तहसिलदार अभिजीत देशमुख यांनी सहर्ष स्वागत केले.यानंतर ठाणे जिल्हाधिकारी श्री.पांचाळ यांनी सर्व विभागासह व्यायामविभागाची पाहणी केली.यावेळी हातांनी घडवलेलं,निसर्गाशी जोडलेलं आदिवासी बांबू बहु उपायोगी वस्तु ठाणे जिल्हाधिकारी श्री.पांचाळ यांना मुरबाड तहसिलदार श्री.देशमुख यांनी भेट देऊन या कार्यालयाच्या कामकाजाची माहितीही तहसिलदार यांनी दिली.
यावेळी नायब तहसिलदार श्री.शिंदे यांच्यासह अधिकारी,तलाठी मंडळाधिकारी कर्मचारी उपस्थित होते.यानंतर मुरबाड तालुक्याच्या भौगौलिक व नैसर्गिक पर्यटन असलेल्या माळशेज घाटाकडे ठाणे जिल्हाधिकारी यांनी प्रस्थान केले.तेथील असलेल्या आदिवासी वाडी वस्तीतील माहिती घेत जिल्हाधिकारी यांनी माहिती ही जाणून घेतली.
जिल्हाधिकारी श्री.पांचाळ यांनी आत्ताच काही महिण्यांपूर्वी ठाणे जिल्हाधिकारी
म्हणून पदभार स्विकारले असून त्यांनी ग्रामीण भागाकडे विशेष लक्ष देऊन विविध असलेल्या
नागरिकांच्या समस्या जाणून घेत ते दूर करण्यासाठी दुरदृष्टी नजर असल्याचे या पाहणीद्वौरातून
दिसते.त्यांनी सुट्टीच्या दिवशीही केलेल्या पाहणी द्वौरातून सर्व नागरिकांनी त्यांच्या
प्रशंसेचे कौतुक केले आहे.





Post a Comment