BIG BREAKING NEWS...

मुरबाड नगरपंचायतीचा अजब कारभार ; पुन्हा मुरबाड तहसिलदारांनाच पत्र...

दि.01,POL,कुणाल शेलार,मुरबाड-

मुरबाड नगरपंचायत हद्दीतील भारत वॉईन शॉप 17 प्रभागाच्या बाहेर हलवून दोन्ही गळ्याचे कर पावती रद्द करणेबाबत व विविध विषयी बाबत तक्रारदार यानी थेट मंत्रालयाचे दालनात आमरण उपोषण करणार असल्याचे पत्रव्यवहार करून इशारा दिला असता याबाबत मुरबाड तहसिलदार यांच्यासह मुरबाड नगरपंचायतीला कळविले असता मुरबाड तहसिलदार यानी मुरबाड नगरपंचायत यांना तात्काळ चर्चा करून कार्यवाही करून उपोषण परावृत्त करण्याबाबत कळविले असता मुरबाड नगरपंचायत अधिकारी यांनी भारत वॉईन शॉपला पत्र न काढता कोणतेही कागदपत्रे यांची मागणी न करता पुन्हा तेच पत्र मुरबाड तहसिलदार यांना पाठवून तक्रारदारालाच त्यांच्याच दालनात चर्चा साठी बोलावले असून सदर विषय दुसरीकडे ढकलण्याचा कारनामा केला आहे यामुळे कर गोळा नगरपंचायत करीत असून मुरबाड तहसिलदार यांच्याकडे विषय पुन्हा पाठवून सारवा सारव केला आहे यावर तक्रारदार यांनी तात्काळ मागणी मान्य करावी अन्यथा कोणत्याही चर्चेसाठी बसण्यासाठी तयार नसल्याचे सांगितले आहे. एक भारत वॉईन शॉपला वाचविण्यासाठी नगरपंचायत कशा पद्धतीने सक्षम झाली आहे याचे हे ज्वलंत उदाहरणच आहे. त्यातच उपोषणकर्ते हे आपल्या उपोषणावर ठाम असून मुरबाड नगरपंचायत कारवाई करिता नसून कर वसुलीकरिता असून सदर कर मुरबाड तहसिलदार यांनाच यापुढे शासनाच्या खात्यात जमा करावे असाच सल्ला दिला आहे.यावर जोपर्यंत भारत वॉईन शॉप 17 प्रभागाच्या बाहेर हलवून दोन्ही गाळे कर पावती रद्द करीत नाही व चौकशी लावत नाही तोपर्यंत उपोषणापासून माघार घेणार नसल्याचे उपोषणकर्ते यांनी ठामपणे सांगितले आहे. (उर्वरित पुढील भागात)

Post a Comment

Previous Post Next Post