दि,04,POL,कुणाल शेलार,मुरबाड -
वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री.प्रसादजी पांढरे साहेब यांनी केलेल्या त्या जिवनातील कार्याची दखल घेत त्यांचा नुकतेच राष्ट्रपती पदक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.त्यांच्या कार्याचा लेखाजोखा हे शुभ्र पांढरं असून त्यांनी हाती घेतलेल्या अनेक इन्व्हेस्टिगेन केसेसमध्ये केलेली उत्तुंग कामगिरी तसेच गुंडगिरी भाईगिरींचा नाहीनाश व अवैध धंदे बंद करणे,अपहरणात गुन्हेगाराला पकडणे याबाबत त्यांची विचारसारणी कार्याची पध्दत कोणालाही जमणार नाही.त्यांनी बॉम्बस्कॉड मध्ये केलेली कामगिरी त्यांच्या कार्याला सलाम करणारी ठरली आहे.ग्रामीण भागातून शिक्षण घेत देशहितासाठी व जनकल्याणासाठी त्यांनी गरिब परिस्थितीतून पोलीस क्षेत्र निवडले त्यानंतर त्यांनी केलेल्या कामगिरीतून त्यांना यशस्वी गरूडझेप यश प्राप्त झाले.कधीही कोणाशी कोणत्याही बाबतीत तडझोड केली नाही.सुस्त असलेले पोलीस प्रशासनाला ज्वलंत करून त्यांना मायेबरोबर ताकदेची ऊब दिली.पोलीस क्षेत्रातून त्यांनी अनेक ठिकाणी आपल्या धाडसी कार्याची कला जगाला दाखवून दिल्याने अनेक माणसांच्या मनात त्यांच्याविषयी प्रेमाची आस्था निर्माण झाली.खर्या अर्थाने त्यांचे पाऊल पदस्पर्श मुरबाड सारख्या ग्रामीण भागाला लागले असता मुरबाड तालुक्यातील अवैध धंदे,मारामारी,भांडणं,चोरी मार्या संपुष्टात आले.आपल्या कर्तव्यशील कार्याने हजारो लाखो माणसांची मने त्यांनी जिंकून घेतली.लहान मुलांपासून ज्येष्ठ वयोवृध्दांपर्यंत पांढरे साहेब हे नावच ध्यान्यात राहिले.मुरबाड सारख्या भागात त्यांनी केलेली पेट्रोलिंग आजही सर्वांच्या ध्यान्यात आहे.त्यांनी दिवसां कर्तव्य बजावयाचे आणि रात्री आपल्या नागरिकांना सुखाची झोप मिळावी व चोर्या मार्या होऊ नये म्हणून दक्षता घेतली आणि याचे खर्या अर्थाने चांगले परिणाम पाहायला मिळाले.त्यांच्या एकाही पेट्रोलिंग मध्ये कधीही कोणते अनुकुचित प्रकार घडले नाही याचे साक्षीदार मुरबाडकर आहे.कधीही वपोनि पांढरे साहेबांनी कोणावर हा लहान तो मोठा असा भेदभाव केला नाही त्यामुळे आजही त्यांच्या प्रती असंख्य माणसाच्या मनात आपल्या कुटूंबातील सदस्यच असल्याचे बोलले जात आहे.
कालपर्यंत पोलीस प्रशासनावर विश्वास न ठेवणारी जनता केवळ प्रसादजी पांढरे साहेबांच्या
कर्तव्यशील कार्याने भाऊन गेल्याने वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री.पांढरे साहेबांमुळे
पुन्हा पोलीस प्रशासनावर दृढ विश्वास ठेवायला लागली आहे.म्हणजे श्री.पांढरे साहेब
ही व्यक्तीमत्व कसे असेल याचा अंदाज लावणं कठीणच आहे असे बोलावं लागेल.''गेलेला विश्वास
संपादन करणं सोपं नसतं परंतु ते केवळ आणि केवळ वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री.प्रसाद पांढरे
यांनी करून दाखविल्याने त्यांचे कौतुक सर्वस्तरातून झाले आहे.''आपल्या खिशात हात घालून
स्वकष्टाने कमविलेल्या पगारातूनच अनेक गरिबांना मदतीचा हात देतांना असे पहिलेच पोलीस
प्रशासक जनतेने पाहिलं आहे.याच मुरबाड कडून त्यांची वडखल पोलीस ठाण्यात बदली झाली असून
तेथेही त्यांनी आपल्या कार्याचा ठसा उमटविला आहे.खाकी वर्दीतील माणूसकी झरी कशी जपावी
याचं उदाहरणच वपोनि.श्री.पांढरे साहेब आहेत आणि हे नाकारता येणारच नाही.त्यातच त्यांच्या
कार्याला पाहून त्यांच्याकडे महत्वपूर्ण गोपनिय अशी उच्च खाती दिल्याने खर्या अर्थाने
शासनेही मान्य केलं की असे पोलीस अधिकारी महाराष्ट्रात असून त्यांच्यामुळे गुन्हेगारी
संपुष्टात येईल आणि त्यामुळेच वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री.प्रसाद पांढरे यांच नाव
कुठं लपून राहिलं नाही.आजही गाव खेडे शहरासह तालुका,जिल्हा,राज्यात त्यांच्या कार्याचा
डंका हा वाजतच असून ते कुठेही गेलेत तरी आपली माणंस त्यांच्या अविस्मरणीय आठवणी आजही
काढून त्यांच्या तब्येतीची विचारपुस करतांना दिसत आहे.याहून आणखी काय हवे असे नेहमी
श्री.प्रसाद पांढरे साहेब बोलतात त्यामुळे असा पारदर्शक,कर्तव्यदक्ष,नैतिकता जपणारं,माणूसकी
झरी जपणारं व्यक्तीमत्व कोणीच होणार नसून आजही ठाणे जिल्हयात श्री.प्रसाद पांढरे साहेब
मोठी पदोन्नती घेऊन यावेत व आम्हाला त्यांची मायेची सावली पुन्हा मिळावी असे परमेश्वरचरणी
प्रार्थना करित आहेत.



Post a Comment