BY,दि.21,POL-मुरबाड -
समता सामाजिक फाउंडेशन, महाराष्ट्र राज्य तर्फे आमदार किसन कथोरे यांच्या वाढदिवसानिमित्त “वादळ” हा विशेष अंक प्रकाशित करण्यात आला. या अंकात आमदार कथोरे यांनी मुरबाड विधानसभा क्षेत्रासाठी केलेल्या महत्त्वपूर्ण विकासकामांची माहिती, तसेच विविध मान्यवरांच्या शुभेच्छा प्रकाशित करण्यात आल्या आहेत.
समता सामाजिक फाउंडेशन समाजोपयोगी कार्यात आघाडीवर असून, विशेषतः विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक मदतीचे उपक्रम राबवून समाजात एक विशेष स्थान निर्माण केले आहे. आमदार किसन कथोरे यांच्या वाढदिवसानिमित्त दरवर्षी या फाउंडेशनकडून विशेष अंक प्रकाशित करण्याची परंपरा आहे.
प्रकाशन कार्यक्रमात वनमंत्री गणेश नाईक आणि ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक राजेश पाटील यांना विशेष अंक भेट देऊन शुभेच्छा देण्यात आल्या.
यावेळी प्रकाशक समता सामाजिक फाउंडेशन महाराष्ट्र राज्य यांच्यासह महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ मुंबई जिल्हाध्यक्ष शंकर करडे, पत्रकार दिलीप पवार,संजय बोरगे,ज्येष्ठ पत्रकार मंगल डोंगरे, शांताराम तांगटकर, नरेश मोरे,किशोर पवार ,तानाजी लोणे, विलास जाधव,चेतन पोतदार आदी मान्यवर उपस्थित होते.





Post a Comment