दि,23,POL,कुणाल शेलार,मुरबाड -
महाराष्ट्रात निवडणूकी
काळात लाडक्या बहिणींचे लाडके भाऊ यांनी 1500 रूपये देण्याचे आश्वासन दिले असता कोणत्याही
प्रकारे पडताळणी न करता थेट त्यांच्या खात्यावर 1500 ची रक्कम दरमहिना देणार असल्याचे
आश्वासन दिले होते परंतु सत्ताधारी यांच्या आश्वासनाच्या यदीत 2100 रूपयाची वाट लाडक्या
बहिणी वाट पाहत असतानाच मुख्यमंत्री लाडकी बहीण योजेतून भावाच्या लाडक्या बहिनी अंगणवाडी सेवकांच्या चाचपाणीच्या माध्यमातून कमी
करण्यात येणार व झाले असल्याची चर्चा सुरू होताच त्यातच आता सर्व लाडक्या बहिणींना ईकेवायसी करण्याचे सांगण्यात आले असता तिन्ही पक्षाच्या लाडक्या भाऊंनी लाडक्या बहिणींचे
हक्क बाधित करण्यास घेतले असल्याची चर्चा आहे.कालपर्यंत मोठ मोठे बाता सांगणारे भाऊ
यांनी लाडक्या बहिणींवरील अन्याय करण्यास घेतले असल्याने हा खटला कोणाच्या दालनात जाईल
असा प्रश्न अनेक बहिणी विचारत आहेत.निवडणूकी काळात भाऊंनी दिलेली रक्कम कालपर्यंत
बरोबर आपल्या खात्यात येत होती परंतू आज ईकेवायसी सांगून लाडक्या बहिणीवरच भावानी
घात घालायला घेत असल्याने लाडक्या बहिणींनी सत्ताधारी भाऊंवर नाराजी व्यक्त केली आहे.ईकेवायसी
करिता लाडक्या बहिणींची धावपळ सुरू झाली असून कुठं आणि कसे करू असा प्रश्न सर्व लाडक्या
बहिणींसमोर पडला आहे.सत्ता मिळावी म्हणून मताच्या लालचेपोटी आम्हाला योजना दाखविली
आणि आता आमचे नाव कोणत्या ना कोणत्या कारणास्तव कमी केले जात असल्याने ही नाराची तीव्रता
भावाच्या प्रती वाढू लागल्याने याचा प्रभाव येत्या निवडणूकीत पढू शकतो असा अंदाज वर्तवला
जात आहे.लाडक्या बहिणींमुळे विकास कामांत निधी कमी पडू लागला असल्याचे जाणकरांचे मत
असून निवडणूकीत 1500 रूपये वरून 2100 रूपयाचे आश्वासन गाजर म्हणून लाडक्या बहिणींच्या
नशिबी भाऊंनी दिले आहे.सरकारी काम आणि बिघाडी काम लाडक्या बहिणींच्या वाटयाला भाऊंनी
आणल्याने ईकेवायसीचा मुद्दा बहिणींना त्रासदायक ठरत आहे.ग्रामीण भागातील महिला भगिनींना ईकेवायसी करण्यास मोठया प्रमाणात अडचणी येत असून सर्वर व व्हेरिफिकेशन फेल्ड असे
उत्तर मिळत असल्याने लाडक्या बहिणींचे कोणत्याही प्रकारे ओटीपी व ईकेवायसी यशस्वी
करण्यास अपयशी ठरले असल्याच्या प्रतिक्रिया दिल्या असून सत्ताधारी सरकारावर तीव्र नाराजी
व्यक्त केली जात आहे.सत्ताधारी यांनी निवडणूकी काळात सरकारला लाडक्या बहिणींनी मतदान
केलं नसल्याची वार्तालाप होत असून त्याचा राग ईकेवायसीच्या माध्यमातून भाऊ काढत असल्याचे
बहिणींकडून बोललं जात असून अगोदर सर्व कागदोपत्री घेऊनही वर्षभरात लाडक्या भाऊंकडून ईकेवायसीच्या माध्यमातून लाडक्या बहिणींचे हक्क पुन्हा हिरावून घेण्यासाठी ही खेळी
केली जात असल्याने लाडक्या बहिणींकडून तीव्र नाराजी व्यक्त केली जात असून रडीचा डाव
येत्या निवडणूकीत लाडक्या बहिणींकडून लाडक्या भावाविरोधात केला जाऊ शकतो अशी शक्यता
नाकाराता येणार नसून मतपरिवर्तन होणार असल्याचे सदर तीव्र नाराजीचा सुर येत्या निवडणूकीत
दिसून येणार असून लाडक्या बहिणींची धावपळ सुरू असून आता ईकेवायसी कुठं करू असा प्रश्नच
पडला आहे.

Post a Comment