दि,24,POL,कुणाल शेलार,मुरबाड -
राज्य सरकारने निवडणूकीच्या
काळात मुख्यमंत्री लाडकी योजना आणून भाऊ बहिणींच्या पाठिशी असल्याचे दाखवून दिले.त्यानंतर
लाडक्या बहिणींनी भाऊंच्या सरकारला सत्तेवर आणले अशी चर्चा सर्वत्र होऊ लागली.कालांतराने
लाडक्या बहिणींना 2100 रूपये ही दिले जातील असे आश्वासन दिले होते परंतु ते आश्वासन
पुर्ण न होता मधेच लाडक्या बहिणीं ज्या निवडणूकी काळात होते त्यातील पडताळणीच्या माध्यमातून
कमी केले असल्याची चर्चा झाली.त्याबाबत नेमकी ते खरे कि अफवा याबाबत माहीती अद्दयापतरी
अस्पष्टच आहे.महिलांना दरमहा भाऊची भेट मिळत असल्याने लाडक्या बहिणींना आधार मिळत होता
त्यामुळे महिलांमध्ये आनंदाचे वातावरण होते परंतु त्यानंतर ईकेवायसी करण्यात सांगण्यात
आले असता ईकेवायसी साठी लाडक्या बहिणींची भाऊंनी धावपळ सुरू केली आहे.त्यामुळे ग्रामीण
भागातील महिलांनी आपले 1500 रूपयाची मिळणारी रक्कम भाऊनी बंद करू नये या भितीनी बहिणींनी ईकेवायसी करण्यासाठी आपली वाटचाल धरली आहे.कालपर्यंत एकही माझी लाडकी बहिण या योजनेपासून
वंचित राहणार नाही याकरिता तारिख पे तारिख वाढविल्या गेल्या परंतु आज त्याच मुख्यमंत्री
लाडक्या बहिणींना एकाच वर्षात ईकेवायसी करण्याची अवश्यक्यता अचानक का भासली ? ज्या
अटी व निकषावर फॉर्मवर भरण्यात आले व त्यानंतर शासन स्तरावरून अपृव्ह करण्यात आले त्या
आमचा काय दोष असे आता लाडक्या बहिणींकडून तीव्रतेतून बोलले जात आहे.ज्यांच्याकडे चारचाकी
गाडया आहेत त्यांना 1500 ची योजना चालु आणि ज्यांकडे सायकलही नाही त्यांना मात्र लाडकी
बहिण योजना बंद हा अन्याय भाऊच करतोय का असे लाडक्या बहिणींकडून प्रतिक्रिया येत आहेत.त्यातच ईकेवायसीकरिता सर्व्हर डाऊन असून ओटीपी मोबाईलवर उशिराने येत असल्याने ओटीपी टाकण्याकरिता
पुढिल प्रक्रिया येत नसल्याने लाडक्या बहिणीं विचारात अडकले आहेत.त्यातच लाडक्या बहिणींना
गाळलेल्याची यादी व्हॉट्सअपवर फिरत असून त्यामध्ये गरिब घरातील ज्यांना आधार नाही अशांची
नावे दिसून येत असल्याने ही यादी खरी की खोटी याबाबत प्रशासनाने अद्दयाप भूमिका जाहीर
केली नाही परंतु या ज्या महिलांचे नाव आहेत त्यांची भावावर तीव्र नाराजी व्यक्त केली
जात असून ही मुख्यमंत्री लाडकी योजनाच बंद करून टाका असा सल्लाच एका लाडक्या बहिणीनी
मुख्यमंत्री यांना या माध्यमातून दिला आहे.ठाणे जिल्हयातील मुरबाड तालुक्यात व्हॉट्सअपवर
फिरणार्या यादीत एकूण 6054 लाडक्या बहिणींचे नाव असून यातील काही महिलांना कमाईचा
कोणताच माध्यम नसून भावानी आपली फसवणूक तर नाही ना केली अशी चर्चा आता रंगू लागली आहे.त्यामुळे
व्हॉट्सअपवर फिरणारी यादी खरी कि अफवा याबाबत शासन प्रशासकांनी आपली भूमिका स्पष्ट
करावी असा सवाल केला जात आहे.

Post a Comment