दि,26,POL,कुणाल शेलार,मुरबाड -
मुरबाड तहसिल कार्यालयात कुशल व कर्तव्यशील तहसिलदार अभिजीत देशमुख यांनी शासकीय नियमानुसार तसेच ज्यारी केलेल्या परिपत्रकानुसार सर्व नायब तहसिलदार,निवासी नायब तहसिलदार त्याचबरोबर अधिकारी तलाठी,मंडळाधिकारी यांनी शासकीय परिपत्रक दि.10 सप्टेंबर 2025 रोजी निर्गमित केलेल्यानुसार ओळखपत्र परिधान करणे गरजेचे असल्याचे ठणकावून आपल्या प्रशासकीय भूमिकेतून सांगितले होते परंतु याच शासकीय परिपत्रकाची पायमल्ली व तहसिलदार यांच्या आदेश सुचनांना न जुमानता ''हम करे सो कायदा'' म्हणून मनमानी प्रकार घडतांना दिसत आहेत.ज्यावेळी प्रशासकीय वरिष्ठ अधिकारी किंवा जिल्हाधिकारी यांचा पाहणी द्वौरा असतो त्यावेळी सर्वच अधिकारी त्यांना खुश करण्यासाठी व त्यांच्या समोर नियमांचे पालन करित असल्याचा देखावा करतात परंतु वास्तव्यात किमान 80 ते 85 टक्के नायब तहसिलदार पासून अधिकारी कर्मचारी हे ओळखपत्र नागरिकांना दिसून येईल असे परिधान करित नसल्याने अधिकारी हा शासनाचा आहे कि खासगी कामापुरता बसविलेला आहे त्यामुळे अनेक प्रश्न जनतेला पडले आहे.मुरबाड तहसिलदार अभिजीत देशमुख यांचे कार्य कौतुकास्पद आहे त्यांच्या दालनात आलेल्या व्यक्तीचे निरासरण 100 टक्के होते परंतु अधिकारी वर्ग आपल्या रूबाबत असल्याने जणू मीच तहसिलदार आहे असे वागतो.आम्हाला अधिकारी यांच्याशी बोलयचे,तुम्ही बाहेर जा अशा गुर्मिठ भाषेत नगरिकांना अपमानीत करतो.परंतु अधिकारी हे विसरले कि हे प्रशासकीय नागरिकांचे आहे तुमचे नाहीत त्यामुळे नागरिकांना आपल्या गुर्मिठ भाषेत बोलले जात असल्याने नागरिकांनी मुरबाड तहसिल कार्यालयातील नायब तहसिलदार पासून अधिकारी यांच्यावर नाराजी व्यक्त केली आहे.
याबाबत मुरबाड तहसिलदार यांना काहीही माहिती नसल्याने तहसिलदार अभिजीत देशमुख जनतेच्या सेवेसी सदैव तत्पर असतात.तहसिलदार साहेब आमचे गार्हाणे येकूण घेतात,आम्हाला न्याय देण्यासाठी स्वतःहून पुढाकार घेतात परंतु काही अधिकारी गुर्मिठ भाषा वापरतात त्यामुळे मुरबाड तहसिल कार्यालयात काही चांगले असताना त्यांची तुलना गर्विष्ठ अधिकारी यांच्यासोबत नाईलाजाने केली जात असल्याच्या प्रतिक्रिया आहेत.अधिकारी वर्ग सध्या भूसंपादनाच्या कामाला लागले असून तहसिलदार नसताना मीच सर्वस्वी असल्याचे दाखवल्याचे आज निदर्शनास आले आहे.बाहेर जा,बाहेर थांबा अशी भाषा वापरणारे अधिकारी यांच्यावर तीव्र नाराजी व्यक्त होत असून तहसिलदार साहेब ही नाराजी कटाक्श भूमिकेतून दूर करून नायब तहसिलदार पासून सर्वच अधिकारी ,कर्मचारी,तलाठी,मंडळाधिकारी यांना ओळखपत्र नागरिकांना दिसेल यासंदर्भात आदेश देतील का असा प्रश्न उपस्थित राहत असून याकडे लक्ष लागून आहे तसेच जो अधिकारी ओळखपत्र परिधान करणार नाही त्याची तक्रार आल्यावर तहसिलदार शिस्तभंगाची कारवाई शासकीय नियमानुसार कारवाई करावी अशी मागणी जोर धरत असून याकडे जिल्हाधिकारी ठाणे यांनीही लक्ष वेधावे त्यांची दिशाभूल करणार्या अधिकार्यांवर कारवाई करावी अशी मागणी या माध्यमातून करण्यात येत आहे.



Post a Comment