दि,07,POL,कुणाल शेलार,मुरबाड -
आजच्या युगात पैशाशिवाय
काहीही होत नाही.माझा काम होण्यासाठी किती महिने वर्ष लागतील याच संभ्रमात गोरगरिब
जनता असते.परंतु त्यांचा संभ्रम हा दूर करून प्रशासनाप्रती विश्वास संपादीत करण्यासाठी
प्रशासक सज्ज असल्याचे मुरबाड तहसिलदार अभिजीत देशमुख यांनी आपल्या प्रशासकीय कार्यातुन
समाजसेवेच्या माध्यमातून तमाम जनतेला दाखवून दिले आहे.इथं एक पैसा न देता जनतेचं काम
झालं पाहिजे,पैसे देऊन काम आता बंद झालेले असून कोणीही असे कृत्य करत असताना आढळून
आल्यास त्यांच्यावर कडक कारवाई करण्याचे धडाडी कार्य मुरबड तहसिलदार श्री.देशमुख
यांनी आता हाती घेतले आहे.हे प्रशासकीय कार्यालय आहे त्यामुळे पैसे देऊन काम करणं चुकीचं
आहे हा विश्वास तमाम जनतेला पटवून देत असतानाच मुरबाड तालुक्यातील मुरबाड शहरातील
नामवंत असलेले रसवंती व्यवसायक राजेंद्र शेळके यांच्या वारसाला न्याय मिळवून देतांना
समोर आले आहे.
कै.राजेंद्र शेळके यांचे 2 ते 3 महिण्यांपूर्वी मृत्यु झाले.त्यांच्या मृत्यु पश्च्यात त्यांचे पत्नी मुले वारस असून सातबाराच्या इतर सदरी हक्कात आपापसातील केस महसुल दालनात सुरू होती त्या केसेसचा निकाल सन 2016 सालात झालेला होता.परंतु मार्गदर्शक योग्य न मिळाल्याने जो सांगेल तसे एैकूण कागदाची रद्दी तयार झाली होती.अनेक वेळा मुंबईसह ठाणे,तहसिलदार कार्यालय,तलाठी चावडी येथे फेरफटका मारून इतर हक्कातील असलेला शेरा कमी कसे करायचे याची मिळत नव्हती अखेर त्यांच्या संघर्षात पाय झिजले.त्यावेळीही त्यांचा संघर्ष महसूल दालनात सुरूच होता अशातच मध्यस्थी त्यांचे आजाराने निधन झाले.त्यानंतर सदर सातबारावर इतर हक्कातील शेरा संदर्भातील विषय त्यांचे वारस पत्नी श्रीमती.उल्का राजेंद्र शेळके व मुलगा दिपराज (छोटू) राजेंद्र शेळके यांना कळाले असता कोणतेही ज्ञान याबाबत नव्हते पण सदर वडीलांचा संघर्ष आम्ही वाया जाऊ देणार नसल्याचे वारस दिपराज यानी मनाशी निश्चय केला.रात्रं दिवस याच संघर्षाची जान वारसांना असल्याने याबाबत मुरबाडचे तहसिलदार अभिजीत देशमुख यांची भेट घेतली व सदर सविस्तर कागदोपत्रे दाखवून पूर्णतः माहिती सांगितली.यावेळी तहसिलदार श्री.देशमुख यांच्यासह मुरबाड मंडळाधिकारी कुर्ले मॅडम,तलाठी विशाल साळवे,मिलींद शिंदे यांनी या वारसाला आपण न्याय मिळवून देण्यासाठी सज्ज असल्याचे एकमत झाले.तहसिलदार श्री.देशमुख यांनी वारस दिपराज (छोटू) राजेंद्र शेळके याला कोकण आयुक्त यांचेकडील एकच केसेसचा निकाली झालेला पुरावा आणून देण्यासाठी सांगितले.त्याच प्राप्त कागदोपत्राच्या रितसर पध्दतीने सन 2016 पासून असलेला सातबारा इतर हक्काच्या सदरी असलेला शेरा कमी केला.
सन
2016 ते 2025 असे 9 वर्षानी धडाडी तहसिलदार अभिजीत देशमुख व त्यांच्या टिमने अखेर न्याय
मिळवून दिला.हा संघर्ष वारसाने संपुष्टात आणून वडिलांच्या संघर्षाला विजय मिळवूनच दिला.सदर
वारसांना न्याय मिळाल्याने सदर वारसांना फेरफार आदालत सेवा पंधरवडा उपक्रमाच्या माध्यमातून
मुरबाड विधानसभेचे कार्यसम्राट आमदार किसन कथोरे यांच्या हस्ते सातबारा व फेरफार देण्यात
आले.मुरबाड तहसिलदार अभिजीत देशमुख यांच्यासमोर हे प्रकरण आल्याने तात्काळ या प्रकरणाकडे
लक्ष वेधून न्याय मिळवून दिल्याने वारसांकडून त्यांचे व त्यांच्या सर्व अधिकारी कर्मचारी
यांचे आभार मानण्यात आले आहे.




Post a Comment