दि.08,POL,मुरबाड -
कुणबी समाजाला मिळालेल्या ओबीसी आरक्षणात
वाटेकरी वाढत असल्याने समस्त ओबीसी समाजाचे आरक्षण संकटात सापडले आहे.त्यामुळे आपले
आरक्षण वाचविण्यासाठी 9 ऑक्टोंबर रोजी मुंबई आझाद मैदान येथे एल्गार मोर्चाचे आयोजन
करण्यात आले आहे.सरकारला दखल घ्यावी असा भव्य मोर्चा मुंबईत होत असून त्याचे नियोजन
चालू आहे.
कोकणासह ठाणे,पालघर जिल्ह्यात मोठ्या संख्येने
कुणबी समाज आहे.त्यामुळे ठाणे, पालघर जिल्ह्यातून मोठ्या संख्येने समाज बांधव सहभागी
होणार असून मुरबाड,शहापूर मध्ये मोर्चाचे नियोजन करण्यासाठी बैठकांचे आयोजन करण्यात
आले आहे. मिळेल त्या वाहनाने किंवा रेल्वेने मुंबई गाठून आझाद मैदानावर समाजाची एकजूट
व ताकद सरकारला दाखवून द्यायची असून हैद्राबाद गॅझेट रद्द झालाच पाहिजे या प्रमुख मागणीसह
ओबीसी समाजाच्या ईतर मागण्यांकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी या मोर्चाचे आयोजन केले
आहे.म्हणून लाखोंच्या संख्येने मोर्चात सहभागी होण्याचे आवाहन कुणबी समाजोन्नती संघ
मुंबई व सर्व ओबीसी संघटनांनी केली आहे.



Post a Comment