दि,08,POL,कुणाल शेलार,मुरबाड -
मुरबाड तालुक्यामध्ये
गेल्या काही महिण्यामध्ये डेकेअरचे क्लिनीक दवाखाने विना परवानगी तसेच खाटा,अधिकृत
नसल्याचे विना शिकाऊ मदतनीस ठेवल्याच्या तक्रारी झाल्या होत्या त्या अनुषंगाने यामध्ये
नक्की डॉक्टर हे बोगस तर नागरिकांवर उपचार करित नाहीत ना याची पार्श्वभूमी नाकारता
येऊ नये म्हणून मुरबाड तालुका आरोग्य विभागाने चोखपणे चौकशी केली होती त्यानंतर मुरबाड
शहरातील मुरबाड नगरपंचायत हद्दीत अनेक ठिकाणी क्लिनीक दवाखाने सर्रासपणे सुरू असून
80 ते 85 टक्के जणांनी नगरपंचायतीकडून नाहरकत दाखले नसल्याची धक्कादायक माहिती उघड
झाली आहे.नेमकी कोणते डॉक्टर,त्यांची डिग्री कोणती,अॅलोपॅथी आहे की आयुर्वेदीक,नागरिकांवर
करण्यात येणारे उपचार योग्य कि अयोग्य यावर आता प्रश्न उभा राहत आहे.मुरबाड तालुका
आरोग्य अधिकारी प्रशासकांनी याकडेही आता लक्ष वेधावे अशी मागणी पत्रकार कुणाल शेलार
यांनी केली. क्लिनीक दवाखाने सुरू असून दर फलक नाहीत,सोयीनुसार फी आकारणी केली जात
असल्याच्या मागे नागरिकांनी तक्रारी केल्या होत्या परंतु त्यावर चौकशी अंतिम कारवाई गुलदस्त्यातच राहिली आहे त्यामुळे मुरबाड शहरातील क्लिनीक दवाखाने यांची चौकशी करून
मुरबाड नगरपंचायतीकडून व्यवसाय करण्यासाठी नाहरकत दाखले न घेतल्याने त्यांच्यावर योग्य
करवाई करावी अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.


Post a Comment