दि.10,POL, कुणाल शेलार, मुरबाड-
मुरबाड तहसिल कार्यालयाचा लोकसहभागाचा अभिनव उपक्रम राबविण्यात येत असून या उपक्रमातून थेट आता एका स्कॅनमधून प्रत्येक गावाची मतदार यादी घर बसल्या मिळणार आहे. या उपक्रमामध्ये प्रत्येक गणाप्रमाणे क्यू आर कोड प्रसिद्ध करण्यात आल्याने ते क्यू स्कॅन करावयाचे आहे त्यानंतर तात्काळ मतदार यादी डाउनलोड होते त्यामुळे जलदगतीने व सोप्या पद्धतीने आता मतदाराला ही यादी पाहता येणार आहे.
सदर राज्य निवडणूक आयोगाने प्रारूप मतदार यादी ऑक्टोबर 2025 रोजी जाहीर करण्यात आलेले आहेत त्या अनुषंगाने मुरबाड तहसिल कार्यालय यांच्याकडून लोकसहभागाचा अभिनव उपक्रम म्हणजे प्रत्येक गणाची आणि गटाची यादी आता एका क्यू आर कोड स्कॅन करून तात्काळ मिळणार असून हे अभिनव उपक्रम जोमाने मुरबाड तालुक्यात सुरुवात केल्यामुळे मुरबाड तहसिलदार अभिजित देशमुख व त्यांच्या सर्व अधिकारी,कर्मचारी टीमचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.



Post a Comment