दि,13,POL,मुरबाड -
मुरबाड तालुक्यातील मुरबाड
शहर हे व्यवसाय म्हणून प्रगतशील मुख्य बाजारपेठ आहे.या शहरात लाखो रुपयांची उलाढाल
होत असते.अशातच दिवाळी सण असल्याने खरेदीसाठी बाजारपेठा सजल्या आहेत.त्यातच मुरबाड
शहरात वाढती लोकसंख्या,रहदारी वस्ती असल्याने मुरबाड शहरात अग्निघातक स्फोटके म्हणून
फटाके यांची साठवणूक गोडाऊन करण्याची परवानगी नसल्याचे सरकारचे नियम असताना मुरबाडमध्ये
छुप्प्या पध्दतीने गोडाऊन रूम शेटरखाली मोठया प्रमाणात विस्फोट पदार्थ फटाके साठा ठेवण्यात
आल्याची खात्रीलायक सुत्रांकडून माहिती मिळाली असून सरकारच्या नियमांना अनेक विक्री
डिलरांनी पायदळी तुडविले आहे.त्यातच याबाबत शोध घेण्यासाठी मुरबाड तहसिलदार श्री.अभिजीत
देशमुख यांना निवेदन देण्यात आले आहे त्याचबरोबर या निवेदनात मुरबाड शहरातील मुरबाड
नगरपंचायत हद्दीतील मातानगर येथील रहदारी वस्तीत अग्निस्फोटके फटाके करण्यासाठी विक्री
दुकानदारांना कोणत्याही स्वरूपाची परवानगी देण्यात येऊ नये असे आज पत्रकार कुणाल शेलार
यांनी मुरबाड तहसिलदार व मुरबाड नगरपंचायतीचे मुख्याधिकारी यांना निवेदन पत्र दिले
आहे.मिळालेल्या माहितीनुसार मुरबाड नगरपंचायतीच्या हद्दीतील मातानगर येथे मागील वर्षी
फटाके विक्री करण्याची कोणालाही परवानगी नसल्याचे मुरबाड तहसिलदार कार्यालयातून कळून
आले असता मग कोणाच्या आशिर्वादाने व नाहरकत दाखल्याने फटाके विक्रीचे स्टॉल लावण्यात
आले? कोणाला हजारोचा हप्ता गेला असा सवाल समोर उभा राहिला आहे.मुरबाड नगरपंचायत एखाद्दया
जागेचा व्यवसायाचा विषय असला की कार्यक्षेत्र सांगते परंतु फटाके विक्री करण्याची परवानगी
आमच्याकडे नसल्याने शासनाच्या जमिनी असल्याचे सांगून महसूल विभागाकडे बोट दाखवते,नाहरकत
दाखले देणारे नगरपंचायत असून बोट मात्र तहसिलदार यांच्या दालनाकडे दाखवित असल्याने
कुंपनच शेत खात असल्याची शंका आता नाकारता येणार नाही.त्यामुळे सदर मातानगर येथील नागरिकांच्या
वस्तीत फटाके विक्रीची परवानगी न देता नगरपंचायतीच्या 1 ते 17 वार्ड कार्यक्षेत्राच्या
बाहेर नागरिकांची वस्ती नसेल तिथं फटाके विक्रीची परवानगी द्दयावी अशी आग्रही मागणी
पत्रकार कुणाल शेलार यांनी केली असून यावर मुरबाड तहसिलदार यांना निवेदन देत मागणीवर
आपण तात्काळ लक्ष वेधावे अशी विनंती केली आहे.निवेदन स्विकारत मुरबाड तहसिलदार अभिजीत
देशमुख यांनी पारदर्शकपणे आमच्या निवेदनाचा स्विकार करून आपल्या निवेदनाची दखल घेऊन
पुढील 2 दिवसांत संबंधित विभागासह अधिकारी यांना सुचना आदेश देण्यात येईल असे आश्वासन
दिले.


Post a Comment